हार्वर्ड बिझनेस स्कूलचे नवे डीन असणार 'हे' मराठमोळं व्यक्तिमत्त्व

By Naukari Adda Team


हार्वर्ड बिझनेस स्कूलचे नवे डीन असणार

मूळ भारतीय असणारे विश्वविख्यात शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत दातार हे विद्यमान अधिष्ठाता नितीन नोहरिया यांच्या जागी नियुक्त होणार आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलला ११२ वर्षांचा इतिहास आहे. श्रीकांत दातार हे सलग दुसरे मूळ भारतीय वंशाचे डीन असणार आहेत.

 

आयआयएम, अहमदाबादमधून श्रीकांत यांनी आपले शिक्षण घेतले होते. पुढील वर्षी जानेवारीत ते पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या विद्यापीठ प्रकरणांचे वरिष्ठ असोसिएट डीन आहेत. हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष लॅरी बेकोव्ह यांनी ही माहिती दिली.

लॅरी बोकोव्ह म्हणाले, 'श्रीकांत दातार एक इनोव्हेटिव्ह शिक्षक आणि अनुभवी अॅकेडमिक लीडर आहेत. बिझनेस स्कूल्सच्या भवितव्याबाबत विचार करणाऱ्या प्रमुख लीडर्सपैकी ते एक आहेत. याव्यतिरिक्त करोना महामारीशी लढण्यातही त्यांनी हार्वर्डमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

११२ वर्षं जुन्या या बिझनेस स्कूलचे दातार हे ११ वे डीन असतील आणि असं पहिल्यांदाच झालंय की सलग दोन वेळा भारतीय वंशाची व्यक्ती हार्वर्ड बिझनेस स्कूलची डीन बनली आहे. सध्याचे डीन नितीन नोहरिया डिसेंबरपर्यंत पदभार सांभाळणार आहेत. पण जूनमध्येच त्यांनी सेवा समाप्तीची घोषणा केली होती.

श्रीकांत दातार हे १९७३ चे पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दातार यांना त्यांच्या नियुक्तीबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. हार्वर्ड मॅगझिनमध्ये दातार यांच्याविषयी प्रकाशित झालेल्या माहितीची लिंक जोडून दातार यांचे अभिनंदन करणारी पोस्ट ठाकरे यांनी ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

'महाराष्ट्रातील लोकांसाठी दातार यांची नियुक्ती ही खूप अभिमानास्पद बाब आहे,' असे ठाकरे यांनी म्हटले आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The new dean of Harvard Business School will be 'He' a Marathi personality

By Naukari Adda Team


Srikant Datar, a world-renowned Indian-origin educationist, has been appointed dean of Harvard Business School. Shrikant Datar will replace the incumbent Nitin Nohria. Harvard Business School has a history of 112 years. Srikanth Datar will be the second consecutive Dean of Indian descent.

Srikanth was educated at IIM, Ahmedabad. He will take over in January next year. He is currently the Senior Associate Dean of University Affairs at Harvard Business School. This information was given by Larry Bekov, President of Harvard University.

Larry Bokov said, ‘Srikanth Datar is an innovative teacher and an experienced academic leader. He is one of the key leaders in thinking about the future of business schools. In addition, he has been instrumental in fighting the Corona epidemic at Harvard.

The 112-year-old business school donor will be the 11th dean and this is the first time that a person of Indian descent has become the dean of Harvard Business School twice in a row. Incumbent Dean Nitin Nohria will hold the post till December. But in June, he announced the end of his service.

Srikanth Datar is a 1973 graduate. He then pursued his post-graduate studies from IIM Ahmedabad.

Chief Minister Uddhav Thackeray has congratulated Datar on his appointment. Thackeray shared a post congratulating Datar on Twitter, linking to information published about him in Harvard Magazine.

"It is a matter of great pride for the people of Maharashtra to appoint a donor," Thackeray said.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda