पदवी परीक्षेत प्रश्नपत्रिकांमध्ये चुका, प्रश्नपत्रिका चक्क 'गुगल ट्रान्सलेट

By Naukari Adda Team


पदवी परीक्षेत प्रश्नपत्रिकांमध्ये चुका, प्रश्नपत्रिका चक्क

अध्ययनाच्या नवनवीन पद्धती जगासमोर मांडणारे, शैक्षणिक मानसशास्त्र सोप्या शब्दात मांडणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ 'क्रो अँड क्रो' या दोघांचा प्रश्नपत्रिकेत कावळा असा उल्लेख करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत चुकांच्या मालिकेचा कळस गाठला आहे. अशा प्रश्नपत्रिकेतील अनेक चुकांचे मॅसेज सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले. त्यासह वर्षभर उर्दूतून अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजी, मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका दिली. इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे थेट सर्च इंजिनवर मराठी ट्रान्सलेशन करून प्रश्नपत्रिका दिल्याने हा गोंधळ वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सुरू असलेल्या या परीक्षेत प्रश्नपत्रिका मधील चुकांनी विद्यार्थी पुरते गोंधळून गेले आहेत. अध्यापक पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. चुकीचे भाषांतर, सारखे पर्याय, फॉन्ट साईज कमी-अधिक, प्रश्नांच्या रचने मधली संदिग्धता यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पेपर हे इंग्लिश मधून गूगल ट्रांसलेट च्या साह्याने भाषांतरित करून देण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले त्यामुळे प्रश्न न आणि त्याचा झालेला भाषांतर यामध्ये अनेक संदर्भ लागत नाही त्यामुळे उत्तर नेमके काय आहे हा प्रश्न पडतो असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे त्याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडे तक्रारही केली आहे. प्रश्नपत्रिकेतील चुकांची हद्द म्हणजे जागतिक दर्जाचे शिक्षणाचे मानसशास्त्र मांडणारे 'क्रो अँड क्रो' यांचा उल्लेख चक्क कावळा असा केला. इंग्रजीत (crow) असे आहे त्याचे चक्क भाषांतर कावळा असे करत आपल्या कारभाराचे प्रदर्शन मांडले आहे. विद्यार्थ्यांना 'अध्ययन म्हणजे सवय विज्ञान आणि दृष्टिकोन प्राप्त करणे...... द्वारा परिभाषित' हा प्रश्न विचारण्यात आला त्यात चार पर्याय देण्यात आले ज्यात गॅरी आणि किंग्सले आणि तींसले आणि दोन नंबरला क्रो अँड क्रो, तीन गेट्स आणि चार ला जे. बी. वॉटसन असे पर्याय आहेत. त्यात क्रो अँड क्रो यांच्या इंग्रजी नावाखाली मराठी ट्रान्सलेशन करताना कावळा आणि कावळा असा उल्लेख असल्याचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विद्यापीठाच्या या कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना त्या भाषेतील प्रश्नपत्रिकाच नाही

विद्यापीठांतर्गत अध्यापक पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशा तीन माध्यमांमधून शिकवला जातो. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी प्रवेश घेतात आणि परीक्षेला सामोरे जातात. तांत्रिक चुकासह उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना शब्द इंग्रजी आणि मराठीतूनच प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. वर्षभर कॉलेजमध्ये उर्दू माध्यमातून शिक्षण घेतले, अभ्यासक्रम उर्दूतून केला आणि परीक्षेत इंग्रजी माध्यमांच्या प्रश्नपत्रिका त्यात मराठी भाषांतराच्या प्रचंड चुका, पर्यायांचा ताळमेळ नसणे यामुळे उर्दू माध्यमाचे विद्यार्थी गोंधळलेले आहेत.

प्रश्नपत्रिकेतील तांत्रिक चुका, प्रश्नपत्रिका त्या-त्या माध्यमातून न देणे यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना या गुणांच्या आधारावर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असतात अशावेळी परीक्षेत असे प्रकार समोर आले. विद्यार्थ्यांनी आमच्यासमोर या सगळ्या चुका मांडल्या. प्राचार्यांनी या बाबी विद्यापीठ प्रशासनासमोर मांडल्या.
डॉ. सय्यद एजाज अली
प्राचार्य, डीएसआर कॉलेज.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mistakes in the question papers in the degree exams, question papers chuck 'Google Translate

By Naukari Adda Team


The world-renowned scientist 'Crow and Crow', who introduced new methods of study to the world and presented academic psychology in simple words, was mentioned as a crow in the question paper. Babasaheb Ambedkar Marathwada University has reached the peak of a series of mistakes in the final year examination question paper. The message of many mistakes in such question papers went viral on social media. He also gave question papers in English and Marathi to the students who studied in Urdu throughout the year. It is being said that this confusion has increased due to the English translation of the English question paper directly on the search engine.

The final year examinations of the undergraduate and postgraduate courses of the university are underway. Students are confused by the mistakes in the question papers in this exam which is conducted both online and offline. Teachers of postgraduate courses have to suffer a lot due to mistakes in the question papers. Misinterpretation, similar options, font size more or less, ambiguity in the composition of the questions have angered the students. The students also said that the paper was translated from English with the help of Google Translate. The extent of the errors in the question paper is that Crow and Crow, which presents the psychology of world-class education, is referred to as a crow. In English, it is a crow, and its translation is like a crow. The students were asked the question 'Study is a habitual science and attaining an approach ...... defined by'. B. Watson has such options. The screen shot of crows and crows being mentioned in Marathi translation under the English name of Crow and Crow is going viral on social media. The students have expressed their displeasure over the management of the university.

Urdu medium students do not have question papers in that language

Undergraduate and postgraduate courses are taught in three mediums namely Marathi, English and Urdu. Through it students get admission and face the exam. Urdu medium students were given question papers in English and Marathi with technical errors. He studied in Urdu medium in the college throughout the year, did the course in Urdu and the English medium question papers in the exams contained huge mistakes in Marathi translation, lack of coordination of options, which has confused the Urdu medium students.

Technical errors in the question papers, not giving the question papers through them will cause huge loss to the students. Final year students will be offered job opportunities on the basis of these marks. The students pointed out all these mistakes to us. The principal presented these matters to the university administration.
Dr. Syed Ejaz Ali
Principal, DSR College.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda