गेट परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ

By Naukari Adda Team


गेट परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ, Extension in filling up the application along with the late fee for GATE exam

आयआयटी मुंबईने गेट २०२१ परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ही परीक्षा देण्यास इच्छुक असलेले उमेदवार आता विलंब शुल्कासह १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतील. गेटचे अधिकृत संकेतस्थळ gate.iitb.ac.in वर विलंब शुल्कासह अर्ज करता येईल.

यापूर्वी विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२० होती. अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, ‘GATE 2021 साठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत बुधवार १४ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.’

परीक्षा कधी होणार?
GATE 2021 परीक्षा ५,६,७,१२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. GATE 2021 साठी अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ पासून उपलब्ध होती.

GATE 2021 परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?

– नोंदणी
आपलं नाव, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरून GOAPS पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करा. एक पासवर्ड तयार करा.

 

-अर्ज भरा
सर्व महत्त्वाची, आवश्यक माहिती भरा आणि आपल्या सोयी आणि पसंतीनुसार गेट २०२१ पेपर आणि परीक्षा केंद्राची निवड करा.

– छायाचित्र अपलोड करा
आपलं छायाचित्रं स्कॅन अपलोड करा. स्वाक्षरी आणि कॅटेगरी सर्टिफिकेटही अपलोड करा.

– शुल्क
नेट बँकिंग किंवा डेबिट / क्रेडिट कार्डाद्वारे अर्जाचे शुल्क भरा.

– अर्ज सादर करा
सर्व माहिती एकदा नीट तपासून घ्या आणि अॅप्लिकेशन फॉर्म सबमिट करा.

GATE 2021 परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया संपल्यावर उमेदवार एकदा आपला अर्ज एडिटही करू शकणार आहे. या दुरुस्तीसाठी २८ ऑक्टोबर रोजी आयआयटी मुंबई गेट पोर्टल उघडणार आहे. GATE 2021 साठी अर्ज केलेले उमेदवार GOAPS ऑनलाइन नोंदणी पोर्टलद्वारे gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर अर्ज एडिट करू शकतील.

 

गेट २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.

GATE 2021: इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी, तसेच अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘गेट’ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://appsgate.iitb.ac.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा, असे यंदाची परीक्षा आयोजक संस्था आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशीष चौधरी यांनी सांगितले.

 

या परीक्षेचे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगळुरू, आयआयटी मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, म्रदास आणि रुरकी या संस्थांच्या वतीने आयोजित केली जाते. यंदा ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी आणि १२ ते १४ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया यंदा ऑनलाइन असणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हवेच, असे बंधन नसणार आहे. यामुळे अंतिम वर्षास पात्र विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत.

गेट ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) च्या मार्फत ही अर्ज प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. विद्यार्थी विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त शुल्कासह कॅटेगरी, पेपर आणि परीक्षा केंद्राचं शहर बदलण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल. अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ रोजी जारी केले जाईल. निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित असेल आणि तीन तास कालावधीची असेल.

ज्या विद्यार्थांना शिक्षण मंत्रालयाकडून मास्टर्स आणि डॉक्टरल पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सहाय्य हवे असते आणि अन्य शासकीय शिष्यवृत्ती हवी असते त्यांनी गेट परीक्षेत पात्र व्हावे लागते. काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्जमधील नोकरीसाठी देखील गेट परीक्षेचा स्कोर ग्राह्य धरला जातो. हा स्कोर तीन वर्षांकरिता वैध असतो.

GATE 2021: काही महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अखेरची तारीख – ३० सप्टेंबर २०२०
विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अखेरची तारीख – ७ ऑक्टोबर २०२०
अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख – ८ जानेवारी २०२१
गेट परीक्षा – ५, ६,७,१३,१३,१४ फेब्रुवारी २०२१
निकाल – २२ मार्च २०२१
सोर्स : म. टा.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Extension in filling up the application along with the late fee for GATE exam

By Naukari Adda Team


IIT Mumbai has extended the deadline for filing applications for GATE 2021. Candidates wishing to appear for the exam can now apply till October 14 with a late fee. Application can be made on the official website of GATE gate.iitb.ac.in with late fee.

Earlier, the last date to apply with late fee was October 12, 2020. The official statement said, "The deadline to register for GATE 2021 is Wednesday, October 14 at 5 pm."

When will the exam be held?
The GATE 2021 exam will be held on February 5, 6, 7, 12, 13 and 14. Admit card for GATE 2021 was available from January 8, 2021.

How to apply for GATE 2021 exam?

- Registration
Register through the GOAPS portal by entering your name, email ID and mobile number. Create a password.

-Fill out the application
Fill in all the important, necessary information and choose the GATE 2021 paper and examination center as per your convenience and preference.

- Upload a photo
Scan and upload your photos. Also upload signatures and category certificates.

- Charges
Pay the application fee through Net Banking or Debit / Credit Card.

- Submit the application
Check all the information once and submit the application form.

Candidates will also be able to edit their application once the registration process for GATE 2021 exam is over. The IIT Mumbai Gate Portal will be launched on October 28 for this repair. Candidates who have applied for GATE 2021 can edit the application on the website gate.iitb.ac.in through GOAPS online registration portal.

Online application for GATE 2021 exam has started from Friday.

GATE 2021: The online application process for the GATE exam, which is required for postgraduate studies in engineering courses, as well as for admission in many foreign universities, has started from Friday. For this, students should go to the website https://appsgate.iitb.ac.in/ and apply, said Shubhashish Chaudhary, Director, IIT Mumbai.

The exam is conducted by Indian Institute of Bangalore, IIT Mumbai, Delhi, Guwahati, Kanpur, Kharagpur, Mradas and Roorkee. This year, the exam will be held in two phases from February 5 to 7 and from February 12 to 14. Also the application process will be online this year. Students will not be required to apply for a mark sheet or certificate. This will also allow eligible students to apply in the final year.

The application will be processed through GATE Online Application Processing System (GOAPS). The deadline to apply online is September 30. Students can apply till October 7 with late fee. After that, there will be time till November 13 to change the city of category, paper and examination center with additional charges. Admit card will be issued on January 8, 2021. The results will be announced on March 22, 2021. The exam will be computer based and will last for three hours.

Students who want financial assistance from the Ministry of Education for master's and doctoral degree courses and other government scholarships have to qualify for the GATE examination. GATE exam scores are also considered for jobs in some public sector undertakings. This score is valid for three years.

GATE 2021: Some important dates
Last date to apply - September 30, 2020
Last date to apply with late fee - 7th October 2020
Admit Card Issue Date - 8th January 2021
GATE EXAMINATION - 5, 6, 7, 13, 13, 14 February 2021
Results - March 22, 2021
Source: m. Ta.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda