५००० हुन अधिक जागा : फूड डिलिव्हरी व्यवसायात रोजगाराची संधी;

By Naukari Adda Team


५००० हुन अधिक जागा : फूड डिलिव्हरी व्यवसायात रोजगाराची संधी; , More than 5,000 jobs: employment opportunities in the food delivery business;

सणासुदीचे दिवस सुरू होत असतानाच देशातील खाद्य पोहोच (फूड डिलिव्हरी) उद्योगास मनुष्यबळाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. नवी नोकरभरती अडखळली असतानाच वार्षिक नोकरी धर-सोड (अ‍ॅट्रिशन) दर २५० टक्क्यांवर पोहोचला आहे.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे कामगार मोठ्या संख्येने गावाकडे परतल्यामुळे एकूणच पोहोच उद्योगात नोकरी सोडण्याचे प्रमाणात वाढले आहे. खाद्य पोहोच उद्योगात त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. लॉकडाऊनमुळे पोहोच कंपन्यांकडील मनुष्यबळ ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. सणासुदीच्या हंगामासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी कंपन्यांनी जोरदार भरती सुरू केली आहे. उदा. झोमॅटो आठवड्याला ५ हजार पोहोच भागीदार शोधत आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ ४० टक्क्यांनी वाढविण्याची कंपनीची योजना आहे. झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले की, आगामी काही महिन्यांत स्थिरता येईल, असे आम्हाला वाटते. काही शहरांत सध्याची मागणी कोविडपूर्व काळातील मागणीपेक्षाही जास्त झाली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला मनुष्यबळ हवे आहे. या श्रमिक व्यवस्थापन क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी ‘बेटरप्लेस’चे सीईओ प्रवीण अगरवाल यांनी सांगितले की, ब्ल्यू-कॉलर श्रमिकांचे स्थलांतर वतुळाकार फिरत असते.

 

 विविध सुरक्षा उपक्रम

काही जाणकारांनी सांगितले की, श्रमिकांना टिकवून ठेवण्यासाठी अनेक कंपन्यांनी सामाजिक सुरक्षा उपक्रम सुरू केले आहेत. स्विगीने अपघात विमा, वैद्यकीय विमा, ऑन-कॉल डॉक्टरांची सोय, पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि वैयक्तिक कर्जासाठी बँकांशी भागीदारी असे उपक्रम हाती घेतले आहेत.

 

 

सोर्स:लोकमत


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


More than 5,000 jobs: employment opportunities in the food delivery business;

By Naukari Adda Team


As the festive season begins, the country's food delivery industry is facing a shortage of manpower. The annual rate of attrition has reached 250 per cent while new recruits have stumbled.

Outbreaks of the corona virus have led to a large number of workers returning to the village, leading to an increase in job losses in the overall outreach industry. Its reach is highest in the food outreach industry. Due to the lockdown, the manpower of outreach companies has been reduced by 40 per cent. Companies will need a lot of manpower for the festive season. For this, companies have started recruiting heavily. E.g. Zomato is looking for 5,000 reach partners a week. The company plans to increase its manpower by 40 per cent to meet the growing demand. "We expect stability in the next few months," a Zomato spokesman said. In some cities, the current demand is even higher than in pre-Kovid period. We need manpower to meet the growing demand. Praveen Agarwal, CEO of Betterplace, a startup company in the field of labor management, said that the migration of blue-collar workers is circular.

Miscellaneous security activities

According to some experts, many companies have launched social security initiatives to retain workers. Swiggy has undertaken activities such as accident insurance, medical insurance, on-call doctor facilities, educational scholarships for children and partnerships with banks for personal loans.

 

 

Source: Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda