दहावी, बारावी परीक्षांबाबत संभ्रम; परीक्षा कशा, कधी होणार?

By Naukari Adda Team


दहावी, बारावी परीक्षांबाबत संभ्रम; परीक्षा कशा, कधी होणार?, Confusion about tenth, twelfth exams; How and when will the exam be held?

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत कोणताही निर्णय जाहीर न केल्याने या परीक्षांची तयारी करणारे ३० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक चिंतेत पडले आहेत. या परीक्षेसाठी आवश्यक असलेले अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होते. मात्र यंदा याबाबत कोणत्याही सूचना अद्याप न आल्याने गोंधळ उडाला आहे. यातच भाषा विषयांच्या कृतिपत्रिकांचा आरखडाही अद्याप जाहीर न झाल्याने या विषयांचा सराव तरी कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थी व शिक्षकांना पडला आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन सराव परीक्षा सुरू केल्या आहेत, मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, ते यापासून वंचित आहेत. यामुळे वस्तुस्थितीचे भान न ठेवता परीक्षांचे नियोजन करण्यात येत असल्याचा आरोप पालकवर्गाकडून करण्यात येत आहे. दहावी, बारावी परीक्षा नेमक्या कधी होणार, कशा होणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट नसल्याने पालक, विद्यार्थी, शिक्षक संभ्रमात आहेत. याबाबत राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप कोणत्याही सूचना न आल्याने सारेच हवालदिल झाले आहेत.

त्याचप्रमाणे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दहावी-बारावीच्या नियमित परीक्षांबाबत गुणांची विभागणी कशाप्रकारे राहील, परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, ती किती गुणांची होईल, याबाबत शाळांना कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने तात्काळ याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी केली आहे. तर करोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच भविष्यातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत काही बदल होणार असेल, त्यात सर्वसमावेशक पर्यायांचा विचार करून विद्यार्थी व पालकांच्या समोर जायला हवे. तसेच ते आधीच कळविणे महत्त्वाचे आहे, दहावी-बारावीच्या नियमित परीक्षांबाबत कोणत्या दृष्टीने विचार सुरू आहे, हे राज्य मंडळ आणि राज्य सरकारने लवकरच जाहीर करायला हवे, असे मुख्याध्यापक अरुण जोशी यांनी सांगितले. यंदा वस्तुनिष्ठ, निम्मस्तरावर व उपयोजित व्यवहारिक ज्ञानावर आधारित असे प्रश्नाचे स्वरूप असावे, असे सहशिक्षक पद्माकर पाचपांडे यांनी सांगितले.

 

१७ नंबरच्या विद्यार्थ्यांचे नुकसान

अद्याप अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने १७ नंबरचा अर्ज भरून बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरून झाल्यावर मार्गदर्शन वर्गही होतात. मात्र अद्याप याबाबत कोणतीही सूचना नसल्याने गोंधळाचे वातवरण असल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.

 

नववी, अकरावीचा स्वतंत्र विचार व्हावा

करोनाच्या पार्श्वभूमीवर 'शाळा बंद, परंतु शिक्षण सुरू' या उपक्रमात ऑनलाइन तसेच स्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन सुरू आहे. या आधारे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाआधारे पुढील वर्गात प्रवेश द्यावा, अशा पद्धतीने इयत्ता नववी व अकरावीबाबत स्वतंत्र विचार करणे आवश्यक असल्याचे मत पालक अशोक जाधवर यांनी व्यक्त केले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Confusion about tenth, twelfth exams; How and when will the exam be held?

By Naukari Adda Team


Mumbai: More than 30 lakh students and their parents are worried as the State Board of Secondary and Higher Secondary Education has not announced any decision on the 10th-12th examinations to be held in February-March. The process of filling up the application form required for this examination is completed in the month of September, October every year. But this year, there has been confusion as no notification has been received yet. As the outline of the worksheets of language subjects has not been announced yet, the question of how to practice these subjects has come up to the students and teachers. Many schools have started online practice exams, but students who do not have smartphones are deprived of it. It is alleged by the parents that the exams are being planned without realizing the facts. Parents, students and teachers are confused as it is not yet clear when and how the 10th and 12th exams will be held. The state education board has not yet received any notification in this regard.

Similarly, the State Board of Secondary and Higher Secondary Education has not yet taken any decision regarding the 10th-12th examinations to be held in February-March. No instructions have been given to the schools regarding the division of marks in the regular examinations of class X-XII, whether the examinations will be online or offline, how many marks they will be. Therefore, the education department should immediately clarify its role in this regard, demanded Sudhir Ghagas, secretary of the Education Revolutionary Organization. So there will be some changes in the X-XII exams on the background of Corona as well as on the background of future uncertainty, in which students and parents should go in front of considering comprehensive options. It is also important to inform in advance, the state board and the state government should announce soon what is being considered for the regular examinations for Class X-XII, said Principal Arun Joshi. This year, the form of the question should be based on objective, semi-level and applied practical knowledge, said co-teacher Padmakar Pachpande.

Loss of students number 17

As the process of filling up the application has not started yet, the students who take the exam from outside by filling up the application number 17 will be at a loss. Guidance classes are also conducted for these students after filling up the application. However, there is an atmosphere of confusion as there is no notice yet, said Prashant Reddys, secretary of the Mumbai Headmasters' Association.

The ninth, the eleventh should be an independent thought

Against the backdrop of Corona, students are learning through online as well as self-study in the 'School closed, but education continues' initiative. On this basis, the students of class I to VIII in the academic year 2020-21 should be admitted to the next class on the basis of internal assessment without taking written test.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda