आता विद्यार्थ्यांना मिळणार मायक्रासॉफ्टचे प्रशिक्षण!!

By Naukari Adda Team


आता विद्यार्थ्यांना मिळणार मायक्रासॉफ्टचे प्रशिक्षण!!, Now students will get Microsoft training !!

देशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार ऑनलाइन शिक्षण मिळावे, या उद्देशाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ‘मायक्रोसॉफ्ट’सोबत करार केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुमारे दीड हजारांहून अधिक कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. यासाठी https://free.aicte-india.org/ हे विशेष वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ‘मायक्रोसॉफ्ट’सोबत करार केला आहे.

https://free.aicte-india.org/  या पोर्टलवर मायक्रोसॉफ्टचे प्रशिक्षण कक्ष ‘मायक्रोसॉफ्ट लर्न’सोबत जोडले गेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, डेटा सायन्स आणि क्लाऊड क्म्प्युटिंगसारखे विषय शिकता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अधिक चांगले प्रशिक्षण देण्यासाठी विविध वेबिनारचे आयोजनही करण्यात येणार असून, मायक्रोसॉफ्टच्या विविध परीक्षांसाठी आर्थिकदृष्ट्या असक्षम एक हजार विद्यार्थ्यांना मोफत संधी दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या नोकरी मिळण्याच्या संधीही यामुळे वृद्धिंगत होतील, असे मत एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत शिक्षण देण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण असेल, असेही ते म्हणाले. करोनाकाळात विद्यार्थ्यांना मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग व्हावा व त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने हा करार करण्यात आल्याचे ‘मायक्रोसॉफ्ट इंडिया’चे अध्यक्ष अनंत महेश्वरी यांनी सांगितले.

तंत्रज्ञान शिक्षणाची संधी
या करारामुळे विद्यार्थ्यांना वर्तमानातील तसेच भविष्यातील तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना त्यांचे स्वत:चे अॅप विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग करणे यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने ‘अझूर फॉर स्टुडंट’ हे व्यासपीठही खुले करून दिले आहे. यात विद्यार्थ्यांना माहितीचा मोठ्या प्रमाणावर खजिना उपलब्ध होणार आहे. तसेच अझूरच्या वार्षिक १०० अमेरिकन डॉलर्स शुल्क असलेल्या २५ मोफत सेवाही त्यांना वापरता येणार आहे.

 

शिक्षकांना प्रशिक्षण
या कराराद्वारे शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट लर्न फॉर एज्युकेटर्स’ हे व्यासपीठही उपलब्ध करून दिले आहे. मायक्रोसॉफ्टने तयार केलेला शिक्षकांसाठीचा विशेष अभ्यासक्रम देण्यात आला आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मायक्रोसॉफ्टचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

 

सोर्स : म. टा.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Now students will get Microsoft training !!

By Naukari Adda Team


The All India Council of Technical Education (AICTE) has entered into an agreement with Microsoft to provide quality online education to students across the country. Through this, more than one and a half thousand courses will be available to the students. A special web portal https://free.aicte-india.org/ has been created for this.

The All India Council of Technical Education (AICTE) has entered into an agreement with Microsoft.

At https://free.aicte-india.org/, Microsoft's training room is linked to Microsoft Learn. In this, students will be able to learn subjects like Artificial Intelligence, IoT, Data Science and Cloud Computing. Various webinars will also be organized to provide better training to the students and one thousand financially disabled students will be given free opportunities for various Microsoft exams.

This will also increase the chances of students getting jobs, said AICTE President Pvt. Expressed by Anil Sahasrabuddhe. He said the agreement would be important for education on state-of-the-art technology. Anant Maheshwari, President, Microsoft India, said that the agreement was signed with the aim of making the best use of the time allotted to the students and giving them the right direction to their skills.

Opportunity for technology education
The agreement will give students the opportunity to study current and future technology. It will also be used by students above the age of 18 to develop their own apps and experiment with artificial intelligence. For this, Microsoft has also opened a platform called 'Azure for Students'. It will provide students with a wealth of information. They will also be able to use Azure's 25 free services with an annual fee of १०० 100.

Teacher training
The agreement will also provide special training to teachers. For this, the platform 'Microsoft Learn for Educators' has also been made available. A special curriculum for teachers has been developed by Microsoft. Upon completion of this training, they will also be given a certificate from Microsoft.

 

 

Source: M.T


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021