खुशखबर : आता दहावीनंतरही घेता येणार सीएसाठी प्रवेश

By Naukari Adda Team


खुशखबर : आता दहावीनंतरही घेता येणार सीएसाठी प्रवेश, Good news: Now you can get admission for CA even after 10th

याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय 'इन्स्टिट्यूट ऑफ चाटर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया'ने (आयसीएआय) घेतला आहे. यामुळे विद्यार्थी सहा महिने आधी सीए होऊ शकणार आहेत. भविष्यात सीए होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना दहावीनंतर नोंदणी करता येणार आहे. 

 

सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी बारावीत गेल्यानंतर नोंदणी करता येत होती. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा याचबरोबर संस्थेशी जोडले गेल्यावर त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यासाठी संस्थेच्या कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. दहावीत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना फाउंडेशनची तयारी करण्यासाठी वेळ मिळेल. यानंतर बारावीनंतर ते फाउंडेशनची परीक्षा देऊ शकतात. त्यांचे प्रवेश मात्र बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरच निश्चित केले जाणार आहेत, असे 'आयसीएआय'चे अध्यक्ष अतुल कुमार गुप्ता यांनी सांगितले.

दहावीत नोंदणी केल्यामुळे अकरावी आणि बारावीचा अभ्यास करत असताना, त्यांचे ज्ञान अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर फाउंडेशनच्या परीक्षेला कसे सामोरे जायचे याचा आत्मविश्वासही निर्माण होईल, असा विशवास गुप्ता यांनी व्यक्त केला. बारावी परीक्षेस पात्र झाल्यानंतर त्यापुढे येणाऱ्या मे किंवा जूनमध्ये होणाऱ्या फाउंडेशन परीक्षेस हे विद्यार्थी पात्र ठरतील. फाउंडेशनची परीक्षा देण्यापूर्वी आवश्यक असलेला चार महिन्यांचा अध्ययन कालावधी हे विद्यार्थी अकरावी व बारावी या दोन वर्षांत त्यांच्या सोयीने पूर्ण करू शकतात. तसेच या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सहा महिने लवकर सीए पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.

 

 

सोर्स  :  म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Good news: Now you can get admission for CA even after 10th

By Naukari Adda Team


An important decision in this regard has been taken by the Institute of Chartered Accountants of India (ICAI). This will allow students to become a CA six months in advance. Students who wish to become CAs in the future no longer have to wait for 12th grade. Such students will be able to register after matriculation.

Students doing CA were previously able to register after passing 12th. However, this important change has been made with the aim of giving students extra time to study as well as developing their professional skills after joining the institute. For this, significant changes have been made in the law of the organization. Upon entering the tenth grade, students will have time to prepare for the foundation. After this, they can take the foundation exam after 12th standard. However, their admissions will be finalized only after passing Class XII, said ICAI president Atul Kumar Gupta.

Enrolling in X will help them to further their knowledge while studying XI and XII. At the same time, it will build confidence in how to face the foundation's exams, said Vishwas Gupta. After qualifying for the 12th examination, these students will be eligible for the foundation examination which will be held in May or June. Students can complete the four-month study period required before appearing for the Foundation exam in the eleventh and twelfth years at their convenience. The decision will also give students a chance to complete their CA six months early, Gupta said.

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda