सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात

By Naukari Adda Team


सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, Beginning of application process for admission in military schools

सैनिकी शाळेत प्रवेश घ्यावा असं स्वप्न बाळगणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. शैक्षणिक सत्र २०२१ साठी देशातील एकूण ३३ सैनिकी शाळांमधील प्रवेशासाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे. प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखेची घोषणादेखील झाली आहे. सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर aissee.nta.nic.in येथे यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी झाले आहे.

 

सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी ते नववी मध्ये प्रवेश होतील. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (AISSEE) चे आयोजन करण्यात येते. २०२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी आणि नववी प्रवेशांसाठी देशभरात ही प्रवेश परीक्षा (AISSEE 2021) १० जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली जाईल.

कधी आणि कसा भरायचा अर्ज?

सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. एआयएसएसईई चे संकेतस्थळ aissee.nta.nic.in द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारी २० ऑक्टोबर २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर २०२० आहे.

अर्ज करण्याच्या वेळीच परीक्षा शुल्क भरावे लागेल. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ४०० रुपये, अन्य सर्व प्रवर्गांसाठी ५५० रुपये आहे.

 

वयोमर्यादा

इयत्ता सहावीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १० ते १२ वर्षादरम्यान असावे. मुलींसाठी सर्व सैनिकी शाळांमध्ये केवळ इयत्ता सहावीतील प्रवेशाचा नियम आहे.

इयत्ता नववीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १३ ते १५ वर्षांदरम्यान असावे. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी उत्तीर्ण असायला हवे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Beginning of application process for admission in military schools

By Naukari Adda Team


There is good news for children and their parents who dream of enrolling in a military school. A notification has been issued for admission in 33 military schools in the country for the academic session 2021. The date of the entrance test has also been announced. A notification in this regard has been issued on the official website of the Military School Entrance Examination at aissee.nta.nic.in.

Military schools will have admission in class VI to IX. For this, All India Sainik School Entrance Exam (AISSEE) is organized by National Testing Agency. The AISSEE 2021 will be held across the country on 10th January 2021 for the sixth and ninth admissions for the academic year 2021.

When and how to fill the application?

Apply online for military school entrance exams. AISSEE website aissee.nta.nic.in. The application process has started from Tuesday, October 20, 2020. The last date to apply online is November 19, 2020.

Examination fee has to be paid at the time of application. Examination fee for SC and ST candidates is Rs.400 / - for all other categories is Rs.550 / -.

Age limit

The age of the student for admission in class VI should be between 10 to 12 years till 31st March 2021. In all military schools for girls, there is a rule of admission only for class VI.

The age of the student for admission in class IX should be between 13 to 15 years till 31st March 2021. Students must have passed Class VIII at the time of admission.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda