सीईटीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; मिळणार आणखी एक संधी

By Naukari Adda Team


 सीईटीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; मिळणार आणखी एक संधी , Great relief to CET students; Another chance

करोना,पाऊस व खंडित वीजपुरवठा अशा कारणांमुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे…

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना (नोंदणी केलेल्या) काही अपरिहार्य कारणांमुळे MHT-CET परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी आणखी एक संधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अतिरिक्त सत्रासाठी अर्ज करायचा आहे. ही नोंदणी २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० या दोन दिवशी सुरू राहणार आहे.
MAH MCA CET 2020 चे हॉलतिकीट जारी
विद्यार्थ्यांना नोंदणी करतानाच अतिरिक्त सत्रासाठी १०० रुपये शुल्क देखील भरायचे आहे. हे शुल्क CAP प्रोसेसच्या वेळी अॅडजस्ट केले जाणार असल्याचे सीईटी कक्षाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, या परीक्षेसाठी करोना,पाऊस व खंडित वीजपुरवठा अशा कारणांमुळे या सीईटी परीक्षेसाठी सर्व साधारण ४०% विद्यार्थी उपस्थित नव्हते. ही गोष्ट सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, प्रवेश नियामक प्राधिकरण व महाराष्ट्र शासन यांच्या लक्षात आणून देण्याचे काम असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन ऐडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया चे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी केले व यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व संबंधित विभागांना तत्काळ पत्रव्यवहार केला होता.

राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत MHT-CET 2020 परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कालावधीत काही विद्यार्थ्यांना करोना, पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर झालेला परिणाम, खंडित वीजपुरवठा आदि कारणांमुळे परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही आणि त्यांची परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. PCB आणि PCM या दोन्ही ग्रुपच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे हॉलतिकीट आले होते, मात्र परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करून १०० रुपये शुल्क भरायचे आहे. त्यांच्यासाठी अतिरक्त सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांचे अतिरिक्त १०० रुपये शुल्क कॅप राउंडमध्ये अॅडजस्ट केले जाईल.’
MHT-CET 2020 च्या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणी करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

https://mhtcet2020.mahaonline.gov.in/

MHT-CET 2020 अतिरिक्त सत्रासंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Click here to see the ad

 

पुन्हा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी 
CET Exam 2020  : ज्या विद्यार्थ्यांना अतिवृष्टीसारख्या कारणांमुळे सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी मिळणार आहे.

CET Exam 2020  : अतिवृष्टीसारख्या कारणांनी एमएचटी-सीईटी परीक्षा देण्यासाठी मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी मिळणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, सीईटी परीक्षा देण्यापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची एक संधी मिळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती.

राज्याती ‘पीसीबी’ गटाची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. तर, ‘पीसीएम’ गटाची परीक्षा १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.सीईटीचे परीक्षा केंद्र प्रामुख्याने शहरी भागात होते. त्याचप्रमाणे शहरी भागात संसर्ग अधिक असल्याने अनेक विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहिले. या अनुपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेची एक संधी देण्यात यावी. सध्या सुरू असणाऱ्या पीसीएम गटाच्या सीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी आधार कार्ड नसणे, मूळ प्रतित ओळखपत्र नसणे, परीक्षा केंद्रावर काही मिनिटांनी उशिरा पोहोचणे अशा कारणांमुळे उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आत सोडले जात नाही. परिणामी या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागत आल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना सीईटी देण्याची एक संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

त्याचप्रमाणे राज्य सरकारने अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या गुणांची पात्रता कमी केल्याने, बारावीत कमी गुण असलेले अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, सीईटीपूर्वी हे विद्यार्थी पूर्वीच्या निकषाप्रमाणे अपात्र असल्याने सीईटीला अनुपस्थित राहिले. नव्या निकषानुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी संधी द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया या संस्थेद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

त्यानुसार एमएचटी सीईटीच्या पीसीबी आणि पीसीएम गटाच्या परीक्षेला अतिवृष्टीसारख्या कारणांनी मुकलेल्या परीक्षा देण्यासाठी एक संधी दिली जाईल. या विद्यार्थ्यांची विशेष सत्रात परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग प्रवेशाची संधी मिळणार आहे.

सीईटीपरीक्षा १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनाला लागले आहे. जे विद्यार्थी २०२० – २१ च्या आॅनलाइन सीईटी परीक्षेकरिता या आधी अर्ज करू शकले नाहीत त्यांना सीईटी सेलकडून पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.

सीईटी सेलमार्फत विविध १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ७ ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून आॅनलाइन अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असेल, असेही सेलने स्पष्ट केले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Great relief to CET students; Another chance

By Naukari Adda Team


Students who missed the CET due to corona, rain and power outages will get another chance.

The State Common Entrance Examination Cell has taken a big decision. The state government has announced another opportunity for students (registered) who could not appear for the MHT-CET exam due to some unavoidable reasons. For this, students have to go to the official website of CET Cell and apply for additional session. This registration will continue on 22nd and 23rd October 2020.
MAH MCA CET 2020 Holtikit issued
Students are also required to pay a fee of Rs. 100 for additional session while registering. These charges will be adjusted during the CAP process, according to a circular issued by the CET cell.
Meanwhile, due to corona, rain and power outage, about 40% of the students did not appear for the CET. This was brought to the notice of the Common Entrance Examination Room, Admission Regulatory Authority and the Government of Maharashtra by Prof. Ramdas Jhol, President of the Association of the Management of an Aided Institute in Rural Areas. Departments were immediately corresponding.

The circular issued by the state government states that the MHT-CET 2020 examination was successfully conducted from 1st to 9th October and from 12th to 20th October, 2020. However, during this period, some students could not reach the examination centers on time due to corona, rains affecting the transport system, power outages, etc. and failed their exams. The state government has decided to give another chance to such students. Students from both the PCB and PCM groups who had registered for the exam and who had a ticket, but could not take the exam, have to re-apply and pay a fee of Rs 100. An additional session will be organized for them. Their additional Rs 100 charges will be adjusted in the cap round. '
Click here to go to the direct link to register for the additional session of MHT-CET 2020.

https://mhtcet2020.mahaonline.gov.in/

Click here to read the MHT-CET 2020 Additional Session Notification.

Opportunity to give CET in special session again
CET Exam 2020: Students who could not take the CET exam due to reasons like heavy rains, will once again get the opportunity to take the CET in a special session.

CET Exam 2020: Students who missed the MHT-CET exam due to reasons like heavy rains will once again get the opportunity to take the CET in a special session. A decision in this regard will be announced soon by the Department of Higher and Technical Education. Higher and Technical Education Minister Uday Samant tweeted about this on Saturday. Meanwhile, there was a demand from parents that students who have dropped out of the CET exam should be given a chance to take the exam.

The state PCB group exams were held from October 1 to 9. So, the PCM group exams will be held from October 12 to 20. The CET exam centers are mainly in urban areas. Similarly, many students were deprived of CET due to high infection in urban areas. These absent students should be given an opportunity to take the exam. Some students are arriving late for the ongoing PCM group CET exams due to non-availability of Aadhar card, lack of original copy of identity card, late arrival at the examination center a few minutes late. So these students are not allowed inside to take the exam. As a result, the parents have complained that these students have to skip the exams. Therefore, it has been demanded that all these students should be given a chance to give CET.

Similarly, as the state government has reduced the eligibility marks for admission to professional degree courses in engineering and pharmacology, many students with less than 12 marks have become eligible for admission. However, these students were absent from the CET as they were ineligible as per the previous criteria before the CET. Higher and Technical Education Minister Uday Samant has been asked by the Association of Management of Unaided Institutes in Rural Areas to give a chance to eligible students for the CET as per the new criteria.

Accordingly, the PCB and PCM group exams of MHT CET will be given an opportunity to take the exams due to reasons such as overcrowding. These students will be examined in a special session, Minister Uday Samant said in a tweet. Therefore, students in the state will get the opportunity of engineering admission.

After the announcement of Higher and Technical Education Minister Uday Samant that CET examination will be held from 1st to 15th October, CET cell administration has started planning. Students who have not been able to apply for the online CET exam of 2020-21 before will be given another chance by the CET cell.

The online application process for 12 different courses through CET Cell has been extended from September 7 to 8. This will be the last chance for students to apply online as a special case, the cell said.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda