NCTE चा TET बाबत महत्त्वाचा निर्णय, शिक्षकांसाठी खुशखबर

By Naukari Adda Team


NCTE चा TET बाबत महत्त्वाचा निर्णय, शिक्षकांसाठी खुशखबर, Important decision of NCTE regarding TET, good news for teachers

शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE) ने केंद्रीय शिक्षक पात्रता परिषद आणि अन्य शिक्षक पात्रता परीक्षांसंबंधी (TET) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एनसीटीईचा हा निर्णय लाखो उमेदवारांना मोठा दिलासा देणारा आहे.

एनसीटीईने आता सेंट्रल टीचर्स एलिजिबिलीटी टेस्ट किंवा देशातील कोणत्याही अन्य राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेला आतापर्यंत असलेली सात वर्ष वैधतेची मर्यादा हटवली आहे. अलीकडेच एनसीटीईच्या ५० व्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाचा अर्थ काय? – CTET TET Validity
यापूर्वी टीईटीची वैधता सात वर्षांची होती. म्हणजेच जेव्हा परीक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण होत, तेव्हापासून पुढील सात वर्षांपर्यंत कोणत्याही सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी करण्यास पात्र असत. मात्र एनसीटीईने आता हा निर्णय घेतला आहे की सर्व शिक्षक पात्रता परीक्षांचे प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध राहील. म्हणजेच आता जे उमेदवार कोणत्याही परीक्षेत यशस्वी होतील, ते नेहमी सरकारी शिक्षक बनण्यास पात्र राहतील.

ज्यांनी यापूर्वी टीईटी उत्तीर्ण केले, त्यांचे काय?
बैठकीत असं सांगण्यात आलं की जे पूर्वी टीईटी उत्तीर्ण झाले आहेत, ज्यांच्याकडे टीईटी क्वालिफाइड सर्टिफिकेट आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू होणार नाही नाही यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

 

नोटिफिकेशननंतर लागू होणार बदल
एनसीटीईने आता यासंबंधी कोणतेही औपचारिक परिपत्रक किंवा तत्सम सूचना जारी केलेली नाही. विविध राज्या पात्रता परीक्षांसाठी संबंधित राज्यांकडून नोटिफिकेशन जारी केले जाईल. त्याचवेळी सीबीएसई बोर्ड देखील अधिकृत संकेतस्थळावर लवकरच यासंबंधी घोषणा करतील. अधिकृत नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर एनसीटीईद्वारे केलेला हा बदल लागू होणार आहे.

 

 

सोर्स : म. टा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Important decision of NCTE regarding TET, good news for teachers

By Naukari Adda Team


There is good news for young people who dream of becoming teachers. The National Council for Teacher Education (NCTE) has taken an important decision regarding the Central Teacher Eligibility Council and other Teacher Eligibility Tests (TET). This decision of NCTE is a great relief to millions of candidates.

The NCTE has now lifted the seven-year validity limit for the Central Teachers Eligibility Test or any other state-level teacher qualification test in the country. The decision was taken at the 50th general meeting of the NCTE recently.

What does this decision mean? - CTET TET Validity
Earlier, the validity of TET was seven years. This means that from the time the candidates passed the examination, they were eligible to work as teachers in any government school for the next seven years. However, the NCTE has now decided that all teacher eligibility test certificates will be valid for life. This means that now the candidates who pass any exam will always be eligible to become government teachers.

What about those who have passed TET before?
The meeting was informed that the decision will be taken after seeking legal advice on whether the decision will not be applicable to those who have passed the TET in the past and have a TET qualified certificate.

Changes will take effect after notification
The NCTE has not yet issued any formal circular or similar notice in this regard. Notifications will be issued by the concerned states for various State Eligibility Tests. At the same time, the CBSE board will soon make an announcement on its official website. This change made by NCTE will come into effect after the issuance of official notification.

 

 

 

Source: m. Ta


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda