NTS परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

By Naukari Adda Team


NTS परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, Extension to apply for NTS exam

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध (एनटीएस) परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३० ऑक्टोबरऐवजी चार नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
राज्यस्तरावरील परीक्षा १३ डिसेंबर रोजी तर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पुढील वर्षी १३ जून रोजी होणार आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील २००० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते.मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य शाखांमध्ये पीएचडी पदवी प्राप्त करेपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, इंजिनियरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट आणि लॉ या विद्याशाखांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती पदव्युत्तर पदवी पर्यंतच दिली जाते.
राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता दहावीत शिकत असलेले नियमित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या परीक्षेसाठी पात्र आहेत. त्यासाठी वयाची उत्पन्नाची किंवा किमान गुणांची अट नाही.तसेच कोणतीही पूर्वपरीक्षा ही देण्याची गरज नाही, असेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Extension to apply for NTS exam

By Naukari Adda Team


Maharashtra State Examination Council has extended the deadline to apply for the state level National Intelligence Search (NTS) examination. Students will now be able to apply for the exam till November 4 instead of October 30. Applications will not be accepted under any circumstances thereafter.
The state level examination will be held on December 13 and the national level examination will be held on June 13 next year. The objective of this scheme is to find intelligent students and encourage them for more education. 2000 wise students from all over the country are selected through national examinations. They are financially supported in the form of monthly scholarships. Scholarships are awarded to students until they complete their PhD in the basic sciences, social sciences and commerce. However, scholarships for professional courses in the disciplines of Engineering, Medical, Management and Law are awarded only up to post-graduate degree.
Regular students studying in class X in any government recognized school in the state are eligible for this examination. There is no requirement of age or minimum marks for this. Also, there is no need to give any pre-examination, the examination council has clarified.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda