अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा

By Naukari Adda Team


अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा, Re-examination for deprived final year students

अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नोव्हेंबरमध्ये पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

 पुनर्परीक्षा घेण्याचे नियोजन 

 कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत वेळेत निर्णय होऊ शकला नाही. अखेर न्यायालयात सुनावणीनंतर यंत्रणा कामाला लागली होती. विद्यार्थांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यानुसार गेल्या १२ ऑक्टोबरपासून ऑनलाइन व ऑफलाइन सुरू झालेल्या या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा लॉगीन न होणे, परीक्षा सुरू होणे, सर्व्हर एरर, टेक्स्ट सबमिट न होणे, चुकीच्या प्रश्‍नपत्रिका उपलब्ध होणे, राज्य सामाईक परीक्षा (सीईटी) व अन्य शासकीय स्पर्धा आदी परीक्षांसोबतच विद्यापीठाच्या परीक्षा आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्याअनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत बैठक होऊन येत्या ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन स्वरूपात पुनर्परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 वेबपोर्टलवरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी 

 ज्या विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्या, अशाच विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे संबंधित अपेक्षित तपशील व अन्य माहिती २ नोव्हेंबरपर्यंत पाठवली जाणार आहे. तक्रारी प्राप्त होऊनही ज्यांना ऑनलाइन परीक्षेबाबत ई-मेल प्राप्त झालेले नसतील, अशा विद्यार्थ्यांनी ३ नोव्हेंबरला रात्री बारापर्यंत विद्यापीठाच्या वेबपोर्टलवरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Re-examination for deprived final year students

By Naukari Adda Team


Savitribai Phule Pune University will conduct re-examination in November for the students who could not appear for the final session of the final year.

Planning for re-examination

Against the backdrop of the Corona crisis, no final decision could be made in time for this year's final exams. The system was finally operational after a court hearing. Students were provided both online and offline options so that they would not be harmed. Accordingly, the students had to face many difficulties in these examinations which started online and offline from last 12th October. Many students could not appear for the exams mainly due to non-login of exams, start of exams, server error, non-submission of text, wrong question papers, state common exams (CET) and other government competitions as well as university exams. Accordingly, a meeting will be held regarding the complaints received and a re-examination is planned to be conducted online from 5th to 7th November.

Fill in the information in the Google form on the web portal

Expected details and other information will be sent by e-mail to the students from whom the complaints were received by November 2. Students who have not received e-mails regarding the online exam despite receiving complaints should fill in the information in the Google form on the university's web portal by midnight on November 3, the university said.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda