खुशखबर.. सरकारी नोकरीची मोठी संधी महापारेषणमध्ये 8,500 जागांची मेगाभरती

By Naukari Adda Team


खुशखबर.. सरकारी नोकरीची मोठी संधी महापारेषणमध्ये 8,500 जागांची मेगाभरती, Good news .. Big opportunity for government job Mega recruitment of 8,500 posts in Mahatrans

महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे.

मुंबई – कोरोनामुळे राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून एकाही विभागात भरतीप्रक्रिया झाली नाही. मात्र, लॉकडाऊन संपुष्टात येत असल्याने हळूहळू विविध विभागात रिक्त पदांची भरती होणार असल्याचे दिसून येते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डिसेंबरपर्यंत पोलीस भरती पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. आता, ऊर्जामंत्री  यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

महापारेषण मध्ये 8500 जागेची भरती लवकरच अपेक्षित
 महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. महापारेषण कंपनीतील ही रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर  नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीचीसंधी या भरतीद्वारे निर्माण होणार आहे.

 ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी ;पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

आयटीआय उत्तीर्ण तरुणांना या भरती प्रक्रियेमुळे सरकारी विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे, तरुणांनी भरती प्रक्रियेच्या तारखा आणि परीक्षेच्या अभ्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Good news .. Big opportunity for government job Mega recruitment of 8,500 posts in Mahatrans

By Naukari Adda Team


The recruitment process for 8,500 technical posts in Mahatrans will start soon. Mahatransport management is preparing for mega recruitment of 6750 posts in technical cadre and 1762 posts in engineer cadre.

Mumbai: No recruitment process has taken place in any department in the state for the last 8 months due to corona. However, with the lockdown coming to an end, it appears that vacancies in various departments will gradually be filled. Home Minister Anil Deshmukh has instructed the department to complete police recruitment by December. Now, the energy minister has announced that as many as 8,500 posts will be filled in the Mahatransport company. Therefore, there is good news for the students who are looking forward to recruitment.

Recruitment of 8500 posts in Mahatrans is expected soon
The recruitment process for 8,500 technical posts in Mahatrans will start soon. Mahatransport management is preparing for mega recruitment of 6750 posts in technical cadre and 1762 posts in engineer cadre. The order to fill these vacancies in the Mahatransport Company was given by the Minister of State for Energy, Dr. Raut said on Friday. Therefore, the path of mega-recruitment in the state is now open. In this new recruitment, I.T.I. A large number of job opportunities will be available to the passing students. Apart from this, job opportunities will also be created for engineering graduates through this recruitment.

As per the suggestion of Energy Minister Dr. Raut, Dinesh Waghmare, Managing Director of Mahatrans, prepared and submitted the recruitment proposal. In the meeting held on this subject in the Ministry, Dr. Raut ordered the recruitment to be completed as soon as possible. At the same time, as per the recommendation of the Bakshi Samiti, the posts should be considered comparatively and the recruitment process should be implemented and he directed the state government to submit the diagram of the newly sanctioned posts.

This recruitment process is providing huge job opportunities to the ITI graduates in the government department. Therefore, young people need to focus on the dates of the recruitment process and the study of the exam.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda