अधिकारी वर्गाची पदे मुंबई मंत्रालयातील रिक्त

By Naukari Adda Team


अधिकारी वर्गाची पदे मुंबई मंत्रालयातील रिक्त, Vacancies in the Ministry of Mumbai

मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे (vacant posts of officers in Mantralaya) न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सूची जारी करुन या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पटोले यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी तयार करुन पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी.  कक्ष अधिकारी पदाच्या 1986 पासूनच्या ज्येष्ठता सुधारीत करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असेही पटोले यांनी सांगितले. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव संजय कुमार यांनी विहित नियामांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

 

सौर्स : डेली हंट


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Vacancies in the Ministry of Mumbai

By Naukari Adda Team


Speaker Nana Patole has directed to expedite the process of filling up the vacant posts of officers in Mantralaya as per the directions of the court and in the prescribed manner. He also said that seniority list of cell officers should be issued and action should be taken to set up a special cell for this purpose.

A meeting was held in the Vidhan Bhavan regarding the pending promotion of officers to the post of cell officer in the ministry. At this time, Patole directed to fill the vacancies immediately. At this time, Nana Patole said that both sides of the administration should immediately present a list of seniority and speed up further action. Patole also said that the process of improving the seniority of the post of cell officer since 1986 would take a long time and that a separate cell should be set up for this purpose. Chief Secretary Sanjay Kumar, who was present at the meeting, said that action would be taken as per the rules.

 

Source: Daily Hunt


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda