बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी

By Naukari Adda Team


बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, Government job opportunity for 12th pass candidates

 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कंबाइंड हायर सेकंडरी (१०+२) लेव्हल परीक्षा (CHSL 2020) परीक्षेचे नोटिफिकेशन जारी केले आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

या नोटिफिकेशननुसार, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय, विभाग आणि कार्यालयांमधील लोअर डिव्हिजनल क्लर्क / ज्युनिअर सेक्रेटिरएट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर्स पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी ६ नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. १५ डिसेंबर २०२० पर्यंत अर्जांची मुदत आहे. संगणकीकृत परीक्षा १२ ते २७ एप्रिल या कालावधीत होणार आहे. टीअर २ परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

 

भरती प्रक्रियेचं सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

अर्ज भरणे - ६ नोव्हेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२०
ऑनलाइन अर्जांसाठी अखेरची मुदत - १५ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० पर्यंत)
ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत - १७ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० पर्यंत)
ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम मुदत - १९ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० पर्यंत)
चलानमार्फत शुल्क भरणा - २१ डिसेंबर २०२० (बँकांच्या कामकाजाच्या वेळेत)
संगणकीकृत टिअर - १ परीक्षा - १२ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१
डिस्क्रिप्टीव्ह पेपर टिअर - २ - तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

 

वयोमर्यादा

किमान वय १८ वर्षे ते कमार वय २७ वर्षे. उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९४ ज्या पूर्वीचा किंवा १ जानेवारी २००३ नंतरचा नसावा. आरक्षित प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत.

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.

 

शुल्क

SSC CHSL 2020 परीक्षेसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. महिला, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ईएसएम प्रवर्गांना कोणतेही शुल्क नाही.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Government job opportunity for 12th pass candidates

By Naukari Adda Team


The Staff Selection Commission (SSC) has issued notification for Combined Higher Secondary (10 + 2) Level Examination (CHSL 2020). The notification has been issued on the official website of the Staff Selection Commission.

According to the notification, recruitment will be for the posts of Lower Divisional Clerk / Junior Secretariat Assistant, Postal Assistant / Sorting Assistant and Data Entry Operators in various Ministries, Departments and Offices of the Central Government. Applications for this recruitment have started from November 6. The deadline for applications is December 15, 2020. The computerized examination will be held from April 12 to 27. The date of Tier 2 examination has not been announced yet.

The detailed schedule of recruitment process is as follows -

Application Filling - November 6, 2020 to December 15, 2020
Deadline for online applications - 15 December 2020 (until 11.30 pm)
Online Deadline - December 17, 2020 (until 11.30pm)
Offline Invoice Deadline - 19 December 2020 (until 11.30pm)
Payment of challan fee - 21st December 2020 (during working hours of banks)
Computerized Tier - 1 Exam - 12 April 2021 to 27 April 2021
Descriptive Paper Tier-2 - Date not yet announced.

Age limit

Minimum age 18 years to Kumar age 27 years. Candidate should not have been born on or before 2nd January 1994. Maximum age concession for reserved categories.

Educational Qualification

Passed 12th or equivalent examination from any recognized board.

Charges

A fee of Rs.100 has been charged for SSC CHSL 2020 exam. There is no charge for women, SC, ST, PWD and ESM categories.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda