दहावी, बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाहीच – वर्षा गायकवाड

By Naukari Adda Team


दहावी, बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाहीच – वर्षा गायकवाड , Tenth and twelfth exams not before May - Varsha Gaikwad

पुढील वर्षी २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेतल्या जाणार नाहीत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली….

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या यंदाच्या परीक्षा मे २०२१ पूर्वी होणार नाहीत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. करोना व्हायरस महामारी स्थितीमुळे परीक्षा मे महिन्याच्या आधी होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.सर्वसाधारणपणे बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात सुरु होते. २०२० मध्येही या परीक्षा नियोजित वेळेतच पार पडल्या होत्या. मात्र दहावीचा केवळ भूगोल विषयाचा पेपर लॉकडाऊनमुळे लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र लॉकडाऊनमुळे पेपर तपासणीला उशीर लागून निकाल विलंबाने लागले. दरम्यान, इयत्ता दहावी, बारावीचे चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे वर्ग करोना महामारी स्थितीमुळे ऑनलाइनच सुरू आहेत. परिणामी या परीक्षा कधी होणार, होणार की नाही याबाबत पालक-विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती.
परीक्षांविषयी माहिती देताना गायकवाड म्हणाल्या, ‘करोना विषाणू संसर्गाची सध्याची स्थिती पाहता ही परिस्थिती आणखी काही काळ राहील, असे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही बोर्डाच्या परीक्षा आणि अभ्यासक्रम आदी मुद्द्यांवर चर्चा केली. राज्य मंडळाला मे २०२१ पू्र्वी दहावी, बारावीच्या परीक्षा घेता येणार नाहीत. आम्ही २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.’

दरम्यान, दिवाळीनंतर २३ नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरु करण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Tenth and twelfth exams not before May - Varsha Gaikwad

By Naukari Adda Team


The 10th and 12th standard examinations to be held in 2021 next year will not be held before May, announced the Minister of School Education Varsha Gaikwad.

This year's 10th and 12th class examinations conducted by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary will not be held before May 2021, has been clarified by School Education Minister Varsha Gaikwad. He clarified that due to the Corona virus epidemic, the exams will not be held before May. Generally, the board exams for Class XII start in February and the exams for Class X start in March. Even in 2020, these exams were passed on time. However, only the geography paper of class X was postponed due to lockdown. However, due to the lockdown, the paper examination was delayed and the results were delayed. Meanwhile, classes for Class X and XII of the current academic year 2020-21 are being conducted online due to the Corona epidemic. As a result, parents and students were skeptical about when the exams would take place.
Giving information about the tests, Gaikwad said, "Given the current state of corona virus infection, the picture is that this situation will continue for some time to come." Against this background we discussed issues such as board exams and syllabus. The State Board will not be able to conduct the 10th and 12th examinations before May 2021. We have already decided to reduce the curriculum by 25 per cent. '

Meanwhile, the state government is considering a proposal to start classes IX to XII from November 23 after Diwali, said School Education Minister Varsha Gaikwad.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda