NMMS Scholarship Exam 2021 अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरूवात

By Naukari Adda Team


NMMS Scholarship Exam 2021 अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरूवात, Application for NMMS Scholarship Exam 2021 starts from Monday

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नियमित अर्ज ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत, तर विलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने ९ ते १६ डिसेंबर आणि अतिविलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने १७ ते २३ डिसेंबरपर्यंत भरता येणार असल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. परीक्षेसाठी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अर्ज करता येतो. शाळेमार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया www.mscepune.in आणि http://nmms.mscescholarshipexam.in या वेबसाइटवर करता येणार आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र ठरतात. शिष्यवृत्तीसाठी निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येते. राज्यात १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांचा यात समावेश असतो. पहिल्या पेपरमध्ये मानसशास्त्रीय चाचणीमध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर, तर दुसरा पेपर हा अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास यांचा समावेश आहे.
प्रत्येक पेपर हा ९० गुणांचा असून, यात पात्रता गुण ४० टक्के मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२ टक्के असा निकष आहे. संबंधित परीक्षेचा निकाल पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेमार्फत सांगण्यात आले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Application for NMMS Scholarship Exam 2021 starts from Monday

By Naukari Adda Team


The Scholarship Scheme Examination (NMMS) for students from economically weaker sections through Maharashtra State Examination Council (MSCE) will be held on March 14, 2021. The schedule for online application process has been announced. According to the schedule, students will be able to fill up regular applications from November 9 to December 8, late applications online from December 9 to 16 and late applications online from December 17 to 23.

Scholarships are given to the economically weaker students from the respective schemes for further education. A student studying in class VIII can apply for the examination. The application process through the school can be done on the websites www.mscepune.in and http://nmms.mscescholarshipexam.in. Students with an annual parent income of less than Rs 1.5 lakh are eligible to apply. Scholarships are selected through a written test. The exam will be held on March 14 in the state. It consists of two subjects, Intellectual Ability Test and School Ability Test. The first paper will be based on the concepts of causality, analysis, compilation etc. in the psychological test, while the second paper will be based on the syllabus. These include general science, sociology, mathematics, physics, chemistry, biology, geography, history.
Each paper is of 90 marks and it is necessary to get 40 percent eligibility marks. The criteria for SC, ST and Divyang students is 32%. The results of the examination will be announced in the second or third week of May next year, the council said.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda