जाणून घ्या - राज्यात मेडिकलच्या ‘इतक्या’ जागा

By Naukari Adda Team


जाणून घ्या - राज्यात मेडिकलच्या ‘इतक्या’ जागा, Know - ‘so many’ medical seats in the state

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, आता एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ‘एमबीबीएस’साठी राज्यातील सरकारी आणि खासगी महाविद्यालयात एकूण ६,६००, तर बीडीएससाठी २,६७६ जागा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) वेबसाइटवर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

‘नीट’चा निकाल वाढल्याने; तसेच ७०:३० कोटा रद्द झाल्याने, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे. ‘सीईटी सेल’ने एमबीबीएस, बीडीएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात केली आहे. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे. या वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांत मोठी चुरस असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या प्रवेशक्षमतेचा अंदाज येण्यासाठी ‘सीईटी सेल’कडून प्रवेशक्षमता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील एकूण २५ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत ४,३३० जागा आहेत, तर १८ खासगी महाविद्यालयांत २,२७० जागा उपलब्ध आहेत. चार सरकारी दंतवैद्यकीय महाविद्यालयांत ३२६ जागा, २५ खासगी दंतवैद्यकीय महाविद्यालयांत २,३५० जागा उपलब्ध असल्याचे ‘सीईटी सेल’कडून सांगण्यात आले आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत उपलब्ध जागांपैकी १५ टक्के जागा ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. यंदा ‘नीट’चा निकाल चांगला लागल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी मोठी चुरस असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रवेशक्षमतेत राज्यातील खासगी विद्यापीठांतील जागांची माहिती वगळण्यात आली आहे.

 

 

सोर्स : म. टा.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Know - ‘so many’ medical seats in the state

By Naukari Adda Team


Admission eligibility for MBBS, BDS courses has now been announced, following the online application process for admission to medical degree courses. Accordingly, a total of 6,600 seats are available for MBBS in government and private colleges in the state, while 2,676 seats are available for BDS. The information has been published on the website of the Maharashtra State Common Entrance Examination Cell (CET Cell).

As the result of ‘Neat’ increases; Also, with the 70:30 quota being canceled, students will have to fight for admission. The CET Cell has started the admission process for medical courses like MBBS, BDS. Accordingly, interested students have to register online till November 12. There is a huge demand among students for admission to these medical courses. Therefore, the admission capacity has been announced by the ‘CET Cell’ to estimate the accessibility available to the students.

There are 4,330 seats in 25 government medical colleges in the state, while 2,270 seats are available in 18 private colleges. According to the CET Cell, there are 326 seats available in four government dental colleges and 2,350 seats in 25 private dental colleges. About 15 per cent of the seats available in government medical colleges are reserved for students seeking admission from the All India quota. Due to the good results of 'Neat' this year, it is expected that there will be a big rush for admission. This admission excludes information on seats in private universities in the state.

 

 

Source: m. Ta.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda