सत्र परीक्षाही ऑनलाइन, मात्र स्वरूपात बदल

By Naukari Adda Team


सत्र परीक्षाही ऑनलाइन, मात्र स्वरूपात बदल, Session exams are also online, but the format changes

अंतिम वर्षांच्या परीक्षांप्रमाणेच आता मुंबई विद्यापीठाच्या या शैक्षणिक वर्षांतील सत्र परीक्षाही ऑनलाइन होणार आहेत. मात्र, अंतिम वर्षांच्या निकालातील गुणांची उधळण पाहून प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल करण्याचा विचार सुरू आहे.

विद्यापीठाचे अनेक अभ्यासक्रम  सत्र पद्धतीनुसार आहेत. म्हणजेच प्रत्येक सत्राला स्वतंत्र विषय अभ्यासण्यासाठी असतात आणि प्रत्येक सत्राची परीक्षाही होते. गेल्या शैक्षणिक वर्षांतील अंतिम वर्षांच्या महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन घेण्यात आल्या. त्यांचे निकालही जाहीर झाले. घरी बसून परीक्षा देण्याची मुभा, बहुपर्यायी प्रश्न पत्रिका, महाविद्यालयांकडून पुरवण्यात आलेले प्रश्नसंच यांमुळे निकालात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली.

अंतिम वर्षांचे निकाल २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढले. विधि विद्याशाखेतही शेकडो विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. आता या शैक्षणिक वर्षांतील सत्र परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. मात्र, गुणांची खिरापत रोखण्यासाठी परीक्षेच्या आणि प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात काही बदल करण्याते येणार आहेत. नुकत्याच झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.

 

बदल कसे?:  तासाभरात सोडवण्यासाठी दिलेले प्रश्न  अवघे २५ होते. बहुपर्यायी स्वरूपातील प्रश्न म्हणजेच चार पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडण्यासाठी एका प्रश्नासाठी जवळपास दोन मिनिटे मिळत होती. त्यामुळे सत्र परीक्षेसाठी प्रश्नांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यंदा अद्याप प्रात्यक्षिकेही झालेली नाहीत. त्यासाठीही पर्याय शोधण्यात येत आहे.

 

 

सोर्स: लोकसत्ता


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Session exams are also online, but the format changes

By Naukari Adda Team


Just like the final year exams, the session exams of this academic year of Mumbai University will also be held online. However, considering the scattering of marks in the final year results, the idea of ​​making some changes in the format of the question paper is being considered.

Many university courses are in session mode. This means that each session has a separate subject to study and each session also has an exam. The final years of the last academic year were taken online at the college level. Their results were also announced. Permission to sit for exams at home, multiple choice question papers, question sets provided by colleges have resulted in a huge increase in results.

Final year results increased by 25 to 30 percent. Hundreds of law students also got marks out of them. Now the university has decided to take the session exams online for this academic year as well. However, some changes will be made in the format of exams and question papers to prevent deterioration of marks. This was discussed at a recent meeting of the Board of Examiners.

How to change ?: There were only 25 questions to be solved in an hour. The multiple choice format question i.e. getting the exact option out of the four options was getting about two minutes for one question. Therefore, the number of questions for the session exam is likely to increase. There have been no demonstrations this year. Alternatives are being explored.

 

Source: Loksatta


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda