औरंगाबाद, लातूर, अकोला, यवतमाळच्या चार सुपरस्पेशालिटीसाठी ८८८ पदांचा प्रस्ताव

By Naukari Adda Team


औरंगाबाद, लातूर, अकोला, यवतमाळच्या चार सुपरस्पेशालिटीसाठी ८८८ पदांचा प्रस्ताव  , 888 posts proposed for four superspecialities at Aurangabad, Latur, Akola, Yavatmal

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात औरंगाबाद, लातूर, अकोला, यवतमाळ या चार ठिकाणी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आली होती. मात्र, त्यासाठी पदमान्यता देण्यात आली नव्हती. अखेर या चारही हॉस्पिटलसाठी प्रथम वर्षाकरिता ८८८ पदांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून पहिल्या वर्षी २९ कोटी ७४४ लाख रुपये इतका निधी लागणार आहे. वैद्यकीय संचालकांनी हा प्रस्ताव वैद्यकीय सचिवांकडे पाठवला आहे. याबाबत लवकरच या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मान्यता मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक तात्याराव लहाने यांनी दिली आहे.
औरंगाबादमध्ये सध्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, कोरोना संपल्यानंतर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू राहणार की नाही तसेच त्यांना पदमान्यता केव्हा मिळणार याची चर्चा सुरू होती. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने त्याबाबत नवा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी औरंगाबादमध्ये लवकरच पदमान्यता देण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
अशी असणार आहेत १८४७ पदे

यात १८४७ पदांसाठी वर्ग १ची ६९ वर्ग २ ची ९८ पदे , वर्ग तीन ७६४ तर वर्ग ३ काल्पनिक पदे बाह्य स्रोत ७२ वर्ग ४ कंत्राटी बाह्य स्रोत ७२८ पदे भरण्यात येणार आहेत. तसेच वरिष्ठ निवासी १ - ४० वरिष्ठ निवासी २ -४० पदे वरिष्ठ निवासी ३ - ३६ पदे अशी १८४७ पदे भरण्यात येणार आहेत. विशेष कार्याधिकारी ४, प्राध्यापक २९, सहयोगी प्राध्यापक ३६, सहायक प्राध्यापक ९०, प्रशासकीय अधिकारी ४, अधिसेविका ४, परिसेविका ४०, अधिपरिचारिका ६०८ परिचर ३७६, वरिष्ठ निवासी ११६, शिपाई ३२,सफाईगार ३२०,क्ष-किरण २० औषध निर्माता २८ अशी पदे आहेत.
 

पहिल्या टप्प्याचा २२२ जागा
औरंगाबाद सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी एकूण ११४८ पदांचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ४५२ पदांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. मात्र प्रत्यक्षात पहिल्या वर्षी केवळ २२२ जागांना पदमान्यता देण्यात आलेली आहे. प्रस्तावात कार्डिओलॉजी ३८, सीव्हीटीएस १६, युरोलॉजी ०९, न्यूरोसर्जरी १२, नेफ्रॉलॉजी १७, एनआयसीयू १०,प्लास्टिक सर्जरी १५,रेडिओलॉजी ५०, सीसीएम सेंट्रल लॅब रक्तपेढी ९८, अॅनेस्थेशिया २८ सीसीएसडी २०, रुग्णालयीन प्रशासन ३०५, नर्सिंग ४४६ असा एकत्रित ११४८ जागांचा प्रस्ताव आहे.


चारही हॉस्पिटलवर तीन वर्षांत पगारापोटी १२९ कोटी
या चारही सुपरस्पेशालिटीसाठी पहिल्या वर्षात ८८८ पदे, दुसऱ्या वर्षात ५५३, तिसऱ्या वर्षात ४०६ अशी १८४७ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्या वर्षी पगारापोटी २९ कोटी ७४ लाख तर दुसऱ्या वर्षी ४७ कोटी ५६ लाख, तिसऱ्या वर्षी ६१ कोटी ८९ लाख असा १२९ कोटी ३६ लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

लवकरच मंत्रिमंडळात प्रस्ताव

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाबतीत चारही हॉस्पिटलसाठीचा पदमान्यतेचा प्रस्ताव वैद्यकीय सचिवांकडे पाठवण्यात आलेला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मान्यता मिळणार आहे. त्यामुळे सध्या कोरोनाचे उपचार हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. पदमान्यनेनंतरच कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे या भागात अतिविशेष उपचारांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. - तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय

डिसेंबरअखेरपर्यंत कोरोनाचे उपचार सुरू राहणार

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णवाढीचे इशारे, दुसरी लाट अशी चर्चा आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत डीसीएच म्हणून तिथे उपचार सुरू राहणार आहेत. तसेच सुपरस्पेशालिटीच्या पदमान्यतेच्या बाबतीतदेखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत. - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद
तीन वर्षांत सुपरस्पेशालिटीत १८४७ पदे भरणार, १२९ कोटींचा पगारापोटी खर्च

पदमान्यतेनंतरही किमान चार महिने लागणार : औरंगाबादच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला पदमान्यता मिळाल्यानंतरही किमान चार महिने पदभरती आणि त्यानंतर प्रत्यक्ष सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू होण्यास लागणार आहेत. त्यामुळे दीडशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे हॉस्पिटल कोरोनानंतर केवळ इमारत न राहता प्रत्यक्षात सुरू होणे गरजेचे आहे.


 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


888 posts proposed for four superspecialities at Aurangabad, Latur, Akola, Yavatmal

By Naukari Adda Team


Superspeciality hospitals were set up at four places in the state namely Aurangabad, Latur, Akola and Yavatmal under the Prime Minister's Health Scheme. However, no designation was given for it. Finally, 888 posts have been proposed for these four hospitals for the first year and the first year will cost Rs 29 crore 744 lakh. The Medical Director has forwarded the proposal to the Medical Secretary. The proposal will be approved by the Cabinet soon, said Tatyarao Lahane, Director, Directorate of Medical Education.
Corona patients are currently undergoing treatment at the Superspeciality Hospital in Aurangabad. However, discussions were underway as to whether the superspeciality hospital would continue after the corona was over and when they would get the designation. However, a new proposal has been prepared by the Department of Medical Education. A few days back, Medical Education Minister Amit Deshmukh had said that the post would be given soon in Aurangabad.
There will be 1847 posts

For 1847 posts, 69 posts of class 1, 98 posts of class 2, 764 posts of class 3 and 72 posts of class 3 fictitious external sources 72 class 4 contract external sources 728 posts will be filled. Also 1847 posts of senior resident 1-40 senior resident 2-40 posts and senior resident 3-36 posts will be filled. There are 4 Special Officers, 29 Professors, 36 Associate Professors, 90 Assistant Professors, 4 Administrative Officers, 4 Servants, 40 Servants, 40 Servants, 608 Servants, 376 Attendees, 116 Senior Residents, 32 Peon, 320 Cleaners, 20 X-Ray Pharmaceuticals, 28 .


222 seats in the first phase
A total of 1148 posts are proposed for Aurangabad Superspeciality Hospital. In the first phase, 452 posts have been proposed. But in reality, only 222 seats have been sanctioned in the first year. The proposal includes 38 Cardiology, 16 CVTS, 09 Urology, 09 Neurosurgery, 12 Nephrology, 17 NICU, 15 Plastic Surgery, 50 Radiology, 50 CCM Central Lab Blood Bank, 98 Anesthesia, 28 CCSD, 20, Hospital Administration 305, Nursing 446.


129 crore in three years at all four hospitals
For all these four specialties, 888 posts will be filled in the first year, 553 in the second year and 406 in the third year. For this, a proposal of Rs 29.74 crore for the first year, Rs 47.56 crore for the second year and Rs 61.89 crore for the third year has been submitted.

Proposal in the Cabinet soon

In the case of superspeciality hospitals, the proposal for accreditation for all the four hospitals has been sent to the Medical Secretary. The proposal will soon be approved by the Cabinet. So Corona is currently undergoing treatment at the hospital. Proceedings will be taken immediately only after the appointment. The superspeciality hospital will help meet the needs of special treatment in this area. - Tatyarao Lahane, Director, Directorate of Medical Education

Corona treatment will continue until the end of December

Corona patients are currently being treated at Superspeciality Hospital. There is talk of an ambulance alert, a second wave. Therefore, treatment will continue there till the end of December as DCH. We will also follow up on the designation of superspeciality. - Sunil Chavan, Collector Aurangabad
1847 posts to be filled in superspeciality in three years, salary expenditure of 129 crores

It will take at least four months even after the accreditation: The superspeciality hospital in Aurangabad will have to be recruited for at least four months after getting the accreditation and after that the work of the actual superspeciality hospital will start. Therefore, this hospital, which was built at a cost of Rs. 150 crore, needs to be started after Corona, not just a building.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda