पुण्यात 18 हजार नोकऱ्यांची संधी

By Naukari Adda Team


पुण्यात 18 हजार नोकऱ्यांची संधी, 18,000 job opportunities in Pune

पुण्यात १८,००० नोकऱ्यांची संधी दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांना राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. राज्यात येत असलेले 15 पैकी 8 उद्योग पुण्यात येणार आहेत. त्यातील 5 उद्योग लॉजिस्टिक्‍स क्षेत्रातील आहेत. हे उद्योग 10 हजार 505 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यातून शहरात 18 हजार 482 जणांना थेट नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पुण्यातील उद्योग क्षेत्राने या गुंतवणुकीचे स्वागत केले आहे.

 

“मॅग्नेटिक महाराष्ट्र” अतंर्गत राज्य सरकारने 2 नोव्हेंबर रोजी 15 कंपन्यांशी करार केले आहेत. त्या कंपन्या राज्याच्या विविध भागांत 34 हजार 850 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून 23 हजार 182 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या पैकी 8 कंपन्या पुण्यातील चाकण, तळेगाव, रांजणगाव, हिंजवडी भागात येणार आहेत. या बाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. “ऑटोमोबाईल”, “IT” आणि सेवा क्षेत्राचे हब असलेल्या पुण्याला आता “लॉजिस्टिक्‍स” कंपन्याही पसंती देऊ लागल्या आहेत, हे आता अधोरेखित झाले आहे, असे विभागीय उद्योग संचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले.

पुण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक्‍स कंपन्या केवळ सुट्या भागांची वाहतूक करणाऱ्या कंपन्या नाहीत तर, आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या ग्राहकाला सर्व सुविधा एकाच छताखाली देणाऱ्या त्या कंपन्या आहेत. वेअर हौसिंग, कस्टम्स आणि मटेरिअल मॅनेजमेंटच्या सुविधा त्या देणार आहेत. त्यामुळे आगामी काळात पुण्याचा औद्योगिक चेहरा-मोहरा बदलू शकतो, असे मत “MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’चे प्र- कुलगुरू डॉ. रवी चिटणीस यांनी व्यक्त केले. पुुणे आणि परिसरात “MBA” ची 100 पेक्षा जास्त तर, अभियांत्रिकीची 50 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या उद्योगांना नजीकच्या काळात कुशल मनुष्यबळ मोठ्या संख्येने उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्‍वास आहे, ही समाधानाची बाब आहे. कोरोनानंतरच्या काळात पुण्याचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर वाढत आहे. त्यामुळे पुण्याकडे उद्योग येत आहेत. आता अंमलबजावणी वेगाने व्हावी आणि कार्गोचा प्रश्‍न सुटावा, एवढीच अपेक्षा आहे.

 

 

सोर्स: सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


18,000 job opportunities in Pune

By Naukari Adda Team


18,000 job opportunities in Pune The state government has given good news to the people of Pune on the occasion of Diwali. Out of 15 industries coming to the state, 8 will come to Pune. 5 of them are in the field of logistics. These industries will invest Rs 10,505 crore. Out of this, 18 thousand 482 people will get direct jobs in the city. Therefore, the Pune industrial sector has welcomed this investment.

The state government has signed agreements with 15 companies on November 2 under "Magnetic Maharashtra". The companies will invest Rs 34,850 crore in various parts of the state, creating 23,182 jobs. Out of these, 8 companies will come to Chakan, Talegaon, Ranjangaon and Hinjewadi areas of Pune. The administrative process in this regard has started. It has been underlined that Pune, a hub for automobiles, IT and services, is now being favored by logistics companies, said Divisional Industries Director Sadashiv Survase.

Logistics companies coming to Pune are not just companies that transport spare parts, they are companies that provide all the facilities to their customers under one roof using modern technology. They will provide warehousing, customs and material management facilities. Therefore, the industrial face of Pune may change in the near future, said Dr. Vice-Chancellor of MIT World Peace University. Expressed by Ravi Chitnis. There are more than 100 MBA colleges and more than 50 engineering colleges in and around Pune. Therefore, a large number of skilled manpower may be available to the industries coming to Pune in the near future, he added.

It is a matter of satisfaction that investors have faith in Maharashtra. In the post-Corona period, the importance of Pune is increasing at the national level. Therefore, industries are coming to Pune. The only expectation is that implementation should be expedited and the issue of cargo should be resolved.

 

 

Source: Sakal


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda