मेडिकलच्या ऑल इंडिया कोट्यात कोविड योद्ध्यांच्या मुलांना आरक्षण

By Naukari Adda Team


मेडिकलच्या ऑल इंडिया कोट्यात कोविड योद्ध्यांच्या मुलांना आरक्षण, Reservation for children of Covid warriors in Medical

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘कोविड योद्ध्यांची मुले’ अशा विशेष कॅटेगरीला गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे MBBS, BDS अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी असलेल्या ऑल इंडिया कोट्यातील जागांमध्ये हे आरक्षण २०२०-२१ या वर्षाकरिता दिले जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी या निर्णयाची घोषणा केली. यानुसार, यंदाच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ऑल इंडिया कोट्यातील पाच जागा कोविड योद्ध्यांच्या मुलांकरिता राखून ठेवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया मेडिकल काऊन्सिल कमिटी (MCC) राबवणार आहे. या विद्यार्थ्यांना मिळालेल्या NEET 2020 परीक्षेतील ऑल इंडिया रँकवर हे प्रवेश आधारलेले असतील.

करोना संक्रमण काळात कोविड योद्ध्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीचा गौरव म्हणून हे विशेष आरक्षण यंदा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. कोविड योद्ध्यांनी करोनाशी युद्ध लढताना आपले कर्तव्य चोख पार पाडले आणि मानवता, सहृदयतेचे दर्शन घडवले असे ते म्हणाले. ज्या कोविड योद्ध्यांनी आपलं कर्तव्य बजावताना आपला जीव गमावला किंवा कोविड-१९ बाधा होऊन ज्यांचा जीव गेला अशा कोविड वॉरियर्सच्या मुलांना MBBS AIQ जागांमध्ये आरक्षण देण्यात येण्याची शक्यता आहे.

कोविड योद्धे या संज्ञेंतर्गत, सर्व प्रकारच्या खासगी, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांमधील कोविड कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. ते-ते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश या योद्ध्यांची कॅटेगरी प्रमाणित करेल.

 

 

 

सोर्स : म. टा.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Reservation for children of Covid warriors in Medical's All India quota

By Naukari Adda Team


The Union Ministry of Health on Thursday approved a special category called 'Children of Kovid Warriors'. Therefore, this reservation will be given for the year 2020-21 in the All India quota seats for admission to MBBS, BDS courses.

The decision was announced by Union Health and Family Welfare Minister Harsh Vardhan. Accordingly, in this year's medical admission process, five seats in the All India quota will be reserved for the children of Kovid warriors. The selection process for students will be carried out by the Medical Council Committee (MCC). These admissions will be based on the All India Rank in the NEET 2020 examination obtained by these students.

Harshvardhan said that the central government has decided to give this special reservation this year in recognition of the incomparable performance of the Kovid warriors during the Corona transition. He said that the Kovid warriors did their duty while fighting the war with Corona and showed humanity and kindness. Children of Covid Warriors who lost their lives in the line of duty or died due to Covid-19 obstruction are likely to be given reservation in MBBS AIQ seats.

The term covid warriors includes covid employees in all types of private, government and local government hospitals. The state or union territory will certify the category of warriors.

 

 

Source: m. Ta.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda