शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती...शाळा सुरु होणार कि नाही

By Naukari Adda Team


शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती...शाळा सुरु होणार कि नाही , Information given by the Minister of Education ... whether the school will start or not

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधील नववी ते अकरावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.

शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी आँनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांनी दिली. दिल्लीत करोनाची लाट पुन्हा आली आहे. तेथे करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार केला जात आहे. अनेक पालकांचाही मुलांना करोना काळात शाळेत पाठवण्यास विरोध आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Information given by the Minister of Education ... whether the school will start or not

By Naukari Adda Team


The government has decided to start classes IX to XI from November 23 in educational institutions in Maharashtra. However, the local administration should take proper precautions while starting the school. The local district officers, group development officers and education officers have been instructed to take decisions in the interest of the health and education of the students only after exchanging views while starting schools in the districts affected by Corona. According to the order, the decision of the local administration will be important in terms of starting schools in the state.

Education Minister Prof. Varsha Gaikwad has given appropriate instructions to the education department officials in this regard. Even though the actual classes have not started, the online learning system will continue. School Education Minister Prof. Varsha Gaikwad told the media that the decision was taken by the education department to protect the health of students and teachers in the wake of the Corona epidemic.

Schools in Mumbai will remain closed till December 31

Meanwhile, schools in Mumbai Municipal Corporation will remain closed till December 31. The decision was taken by the Mumbai Municipal Commissioner on the background of Karona, said Sandhya Doshi, chairperson of the education committee. The wave of corona has come again in Delhi. The number of corona sufferers there is increasing day by day. Against this background, the decision to start a school is being reconsidered. Many parents are also opposed to sending their children to school during the Corona period.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda