जाणून घ्या - CBSE: 2021 मध्ये होणार बोर्ड परीक्षा

By Naukari Adda Team


जाणून घ्या - CBSE: 2021 मध्ये होणार बोर्ड परीक्षा, Know - CBSE: Board exam to be held in 2021

सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा होणार की होणार नाही याविषयीच्या सर्व शंकाकुशंकांना बोर्डाने पूर्णविराम दिला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा आयोजित करणार आहे आणि लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी ही माहिती दिली.

लवकरच सीबीएसईच्या संकेतस्थळावर cbse.nic.in वर याबाबतची सविस्तर माहिती अपडेट केली जाणार आहे. त्रिपाठी म्हणाले, ‘बोर्ड परीक्षा निश्चित स्वरुपात होणार आणि लवकरच कार्यक्रम घोषित केला जाणार. सीबीएसई यासंदर्भातील योजना बनवत आहे.’

‘मार्च-एप्रिल दरम्यान आम्ही आमची पुढील वाटचाल समोर ठेवली होती. आमच्या शाळा आणि शिक्षकांनी बदल स्विकारला. शैक्षणिक उद्दिष्टांसाठी नव्या तंत्रांचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेतले. काही महिन्यातच ऑनलाइन वर्ग सुरु झाले. अॅप्स आले,’ असेही त्रिपाठी म्हणाले.

अंतिम तारखांचे स्वरुप स्पष्ट नाही
पुढील वर्षी सीबीएसई बोर्ड परीक्षा होणार हे नक्की असले तरी अद्याप अंतिम तारखा निश्चित झालेल्या नाहीत. परीक्षा कशा पद्धतीने होणार याबाबतची देखील कोणतीही माहिती वा घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वसाधारणपणे बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवार आणि मार्च महिन्यात आयोजित केल्या जातात.

आतापर्यंत गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांनी कोविड -१९ महामारी आणि त्यामुळे झालेलं चालू शैक्षणिक वर्षाचं नुकसान लक्षात घेऊन दहावी, बारावी बोर्ड परीक्षा मे महिन्यापर्यंत पु्ढे ढकलल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे करोना महामारीमुळे खूप नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, काही शाळांनी तेही विलंबाने सुरू केले. दहावी, बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू होण्याबाबतही समानता नाही. काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत तर काही ठिकाणी बंद आहेत. परिणामी या दोन राज्यांनी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

 

 

 

सोर्स : म. टा.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Know - CBSE: Board exam to be held in 2021

By Naukari Adda Team


The CBSE Board has put an end to all doubts about whether the Class X and XII examinations will be held or not. The Central Board of Secondary Education will conduct board examinations for class X and XII and the dates of the examinations will be announced soon. This information was given by CBSE Secretary Anurag Tripathi.

Details will be updated on CBSE's website cbse.nic.in soon. Tripathi said, ‘The board exam will be held in a fixed format and the schedule will be announced soon. CBSE is making plans in this regard. '

‘Between March-April we had our next move ahead. Our schools and teachers embraced change. Trained to use new techniques for educational purposes. Within months, online classes began. Apps came, 'said Tripathi.

The nature of the deadlines is not clear
Although it is certain that the CBSE board exam will be held next year, the final dates have not been fixed yet. No announcement has been made as to how the exam will be conducted. Generally, board exams are held in February and March.

So far, states like Gujarat and Maharashtra have postponed the 10th and 12th board exams till May in view of the Kovid-19 epidemic and the consequent loss of the current academic year. The students have suffered a lot due to the Corona epidemic in the current academic year. Online education is on, some schools started it too late. There is no similarity between the tenth and twelfth classes. Schools have started in some places and closed in others. As a result, the two states have postponed board exams.

 

Source: M.T


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda