जानेवारी 2021 JEE Main परीक्षा लांबणीवर पडणार का?

By Naukari Adda Team


जानेवारी 2021 JEE Main परीक्षा लांबणीवर पडणार का?, Will the January 2021 JEE Main exam be postponed?

जानेवारी २०२१ च्या जेईई मेन परीक्षेसंदर्भात लाखो विद्यार्थी-पालकांच्या मनात संभ्रम आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आतापर्यंत या परीक्षेसंदर्भात कोणतेही नोटिफिकेशन जारी केलेलं नाही. विद्यार्थ्यांमध्ये अद्याप या परीक्षेच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण आहे. कोविड-१९ विषाणू महामारीमुळे ही परीक्षा रद्द होणार, लांबणीवर पडणार की नेमकं काय होणार याबाबत अनिश्चितता आहे.

यासंबंधी एनटीएने कोणतीही अधिकृत सूचना जारी केलेली नाही. मात्र एनटीएच्या सूत्रांचं म्हणणं आहे की परीक्षा रद्द होणार नाही. दुसरीकडे आयआयटी दिल्लीचे निवृत्त फॅकल्टी आणि एनटीएच्या सल्लागारांचं म्हणणं आहे की ‘परीक्षा रद्द होणार नाही, मात्र विलंब होऊ शकतो. २०२१ च्या बोर्ड परीक्षांच्या शेड्युलच्या आधारेच जेईई मेनचे शेड्युल जारी होईल. तारखा एकमेकांशी क्लॅश होऊ नये, हे ध्यानात ठेवले जाईल. त्यामुळे जेईई मेन जानेवारी २०२१ परीक्षेत विलंब होऊ शकतो.’

इंजिनीअरिंगच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) संबंधी एक मोठी घोषणा करण्यात आली ाहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले, ‘नव्या शिक्षण धोरणांतर्गत (NEP 2020) जॉइंट अॅडमिशन बोर्ड (JAB) ने निर्णय घेतला आहे की जेईई मेन देशातील अन्य प्रादेशिक भाषांमध्येदेखील आयोजित करण्यात येईल.’

पोखरियाल यांनी एका अन्य ट्विट मध्ये लिहिलं आहे की ‘ज्या राज्यामधील इंजिनिअरींग कॉलेजांमधील प्रवेश प्रादेशिक भाषांमध्ये होणाऱ्या परीक्षांच्या आधारे होतात, त्या राज्यांमध्ये या परीक्षा त्या प्रादेशिक भाषांमध्ये होतील. अशा राज्यांच्या भाषा आता जेईई मेन परीक्षेत समाविष्ट केल्या जातील.’

दरम्यान, सध्या जेईई मेन हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत आयोजित केली जाते. दुसरीकडे, वैद्यकीय प्रवेशांसाठी होणारी नीट परीक्षा मात्र एकूण ११ भाषेत आयोजित केली जाते. जेईई मेन मध्ये देखील अन्य भाषांचा समावेश केल्यामुळे परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सुविधा मिळेल. आपल्या सोयीनुसार ते प्रश्नपत्रिकेच्या भाषेची निवड करू शकतील.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Will the January 2021 JEE Main exam be postponed?

By Naukari Adda Team


Millions of students and parents are confused about the JEE Main exam of January 2021. The National Testing Agency (NTA) has not yet issued any notification regarding this test. There is still confusion among the students regarding this exam. Due to the Kovid-19 virus epidemic, the exam will be canceled, postponed or there is uncertainty about what will happen.

The NTA has not issued any official notice in this regard. However, NTA sources said that the exam will not be canceled. Retired IIT Delhi faculty and NTA advisors, on the other hand, say that ‘the exam will not be canceled, but may be delayed. The schedule of JEE Main will be issued based on the schedule of 2021 board exams. Dates should not clash with each other, it will be kept in mind. Therefore, the JEE Main January 2021 exam may be delayed. '

A major announcement has been made regarding the Joint Entrance Exam (JEE Main) for admissions to undergraduate courses in engineering. Union Education Minister Dr. Ramesh Pokhriyal Nishank has given information in this regard by tweeting.

Education Minister Pokhriyal said, "Under the new Education Policy (NEP 2020), the Joint Admission Board (JAB) has decided that JEE Main will be conducted in other regional languages ​​of the country as well."

In another tweet, Pokhriyal wrote, "In states where admissions to engineering colleges are based on examinations in regional languages, the examinations will be held in those regional languages." The languages ​​of such states will now be included in the JEE Main exam. '

Meanwhile, JEE Main is currently conducted in Hindi, English and Gujarati. On the other hand, proper examinations for medical admissions are conducted in a total of 11 languages. The inclusion of other languages ​​in the JEE Main will also facilitate students in the examination and admission process. They can choose the language of the question paper as per their convenience.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021