मंदीत संधी! IT कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू; 4 लाखांपासून 70 लाखांपर्यंत मिळणार पॅकेज

By Naukari Adda Team


मंदीत संधी! IT कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू; 4 लाखांपासून 70 लाखांपर्यंत मिळणार पॅकेज, Opportunity in recession! IT companies start recruitment process; Packages ranging from Rs 4 lakh to Rs 70 lakh

मुंबई: कोरोनामुळे गेले काही महिने संपूर्ण देशावर आर्थिक संकट आलं होतं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पण हळूहळू सगळं काही पूर्वपदावर येत आहे. आता आयटी कंपन्यांनी पुन्हा एकदा भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. स्टाफिंग फर्म एक्सफेनो च्या रिपोर्टनुसार, आयटी कंपन्या आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये  ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त लोकांची भरती झाली होती. आयटी क्षेत्राशी निगडीत असलेल्या सुमारे 1 लाख लोकांना ऑक्टोबरमध्ये रोजगार मिळाला. अशी माहिती हॉट टेक जॉब्स आणि हॉट स्किल्स Indian Unicorns & Soonicorns च्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

नवीन नोकऱ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, ऑक्टोबरमध्ये एक्सेंचर कंपनीत 3000 जागा होत्या. आता त्यामध्ये वाढ होऊन 7000 एवढी संख्या झाली आहे. नोकरीच्या जागा दिवसेंदिवस वाढत आहेत ही बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बाब आहे. IBM मध्ये ज्युनिअर लेव्हलच्या पोस्टसाठी 1725 जागा उपलब्ध आहेत. विप्रो कंपन्यांमध्ये 800 जागा उपलब्ध आहेत. कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहेत ते जाणून घेऊया

फुल स्टेक डेव्हलपर

या पदासाठी प्रोग्रामिंगच्या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच React.JS [Redux]आणि Angular.JS फ्रंट अँड तसेच बॅक एंड सारख्या Node.JS ची माहिती असणं आवश्यक आहे. ज्युनिअर लेव्हल आणि अनुभवी लोकांसाठीही या नोकऱ्या उपलब्ध आहेत. या पदांवर काम करणाऱ्या फ्रेशर्सना वर्षाला 4-6 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं तर अनुभवी व्यक्तींना 12 लाखांपर्यंत पैसे कमवण्याची संधी आहे.

क्लाऊड कॉम्प्युटरिंग

कोरोना काळामध्ये क्लाऊड कॉम्प्युरिंग मार्केटमध्ये मोठी वाढ झाली आहे. Amzon वेब सर्व्हिसेस, Azureआणि गूगल क्लाउड यासारख्या प्लॅटफार्म्सवर सध्या बंपर हायरिंग सुरू आहे. यामध्ये वर्षाला 4 ते 35 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवण्याची संधी आहे.

डेटा इंजिनिअर्स

Hadoop सारख्या डेटा फ्रेमवर्कवर काम करण्यासाठी इंजिनिअर्सना पायथॉन आणि आरसारख्या प्रोग्रामिंग भाषांचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये काम करणाऱ्या फ्रेशरला वर्षभरात 4 -6 लाख कमवण्याची संधी आहे. तर 3  वर्षांपर्यंत अनुभव असणारी व्यक्ती वर्षाला 14 ते 15 लाखांच्या घरात पैसे कमवू शकते. तर अनुभवी इंजिनिअर्सना 70 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं. पदांबद्दलची अधिक माहिती संबंधित कंपन्यांच्या वेबसाईटवरुन मिळवता येईल.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Opportunity in recession! IT companies start recruitment process; Packages ranging from Rs 4 lakh to Rs 70 lakh

By Naukari Adda Team


Mumbai: The Corona has hit the entire country in the last few months. Many lost their jobs. But slowly everything is coming back to normal. Now IT companies have once again started the recruitment process. According to a report by staffing firm Xfeno, IT companies and startups had the highest number of recruits in October. About 1 lakh people associated with the IT sector got employment in October. Such information has come out from the report of Hot Tech Jobs and Hot Skills Indian Unicorns & Soonicorns.

The number of new jobs is increasing day by day. For example, Accenture had 3,000 seats in October. Now it has increased to 7000. It is a matter of joy for the unemployed youth that job opportunities are increasing day by day. IBM has 1725 seats available for junior level posts. There are 800 seats available in Wipro companies. Let us know for which posts recruitment is underway

Full steak developer

Knowledge of programming language is required for this position. Also need to know Node.JS like React.JS [Redux] and Angular.JS front end as well as back end. These jobs are also available for junior level and experienced people. Freshers working in these positions can get a package of up to Rs 4-6 lakh per annum while experienced individuals have the opportunity to earn up to Rs 12 lakh.

Cloud computing

The cloud computing market has grown significantly during the Corona period. Bumper hiring is currently underway on platforms such as Amzon Web Services, Azure and Google Cloud. It has an opportunity to earn between Rs 4 lakh and Rs 35 lakh a year.

Data Engineers

Knowledge of programming languages ​​such as Python and R is essential for engineers working on data frameworks such as Hadoop. Freshers working in this have the opportunity to earn Rs 4-6 lakh in a year. A person with up to 3 years of experience can earn Rs 14 lakh to Rs 15 lakh a year. Experienced engineers can get a package of up to Rs 70 lakh. More information about the posts can be found on the websites of the respective companies.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda