दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच ! 23 एप्रिलनंतर होईल परीक्षा

By Naukari Adda Team


दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच ! 23 एप्रिलनंतर होईल परीक्षा, X-XII exams offline only! The exam will be held after April 23

ऑनलाईन परीक्षा अशक्‍य

 

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असते. दुसरीकडे त्यांच्या विषयांची संख्याही खूप असल्याने ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍य आहे. परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे. दरवर्षी दहावी- बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी- मार्चपासून सुरु होते. मात्र, यंदा कोरोनामुळे 15 जूनऐवजी 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. तत्पूर्वी, ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांना एकतर्फीच शिक्षण मिळाले. आता 23 एप्रिलपर्यंत हे वर्ग सुरु राहणार असून त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु झाले आहे. दरम्यान, जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, त्यांच्यासाठी गुगल मिटद्वारे ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. 23 एप्रिलपर्यंत किमान 70 टक्‍क्‍यांपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने शिक्षकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या 25 हजार 866 पैकी साडेनऊ हजार शाळा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे 59 लाख 27 हजार 456 पैकी सुमारे चार लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत येत आहेत. त्यात दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आता एक ते दीड महिना उशिराने दहावी- बारावीची परीक्षा घेण्याचे नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले असून जानेवारीत बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर होईल, असेही सांगण्यात आले.

 

 सोर्स: सकाळ   

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


X-XII exams offline only! The exam will be held after April 23

By Naukari Adda Team


Online Exam Impossible

The number of 10th and 12th class students is very large. On the other hand, due to the large number of subjects, it is impossible to take the exam online. A meeting will be held soon to decide the schedule of the examination. Every year 10th-12th board exams start from February-March. However, this year the ninth to twelfth classes started from November 23 instead of June 15 due to Corona. Prior to that, online education was offered. However, the students got one-sided education from it. The classes will now continue till April 23, after which planning for the exams has started. Meanwhile, for those students who do not come to school, online education is also planned through Google Meet. Teachers have been instructed to plan for completion of at least 70 per cent of the courses by April 23. Nine and a half thousand schools have been started out of 25 thousand 866 from ninth to twelfth standard. On the other hand, out of 59 lakh 27 thousand 456, about four lakh students are coming to school. It has the highest number of 10th-12th class students. Therefore, the planning for the 10th-12th examinations, which is now one to one-and-a-half months late, has started on a war footing and the schedule will be announced by the board in January.

 

 Source: Morning

 


 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda