खुशखबर लवकरच सुरु होणार मेगा भरती !

By Naukari Adda Team


खुशखबर लवकरच सुरु होणार मेगा भरती !, The good news is that mega recruitment will start soon!

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर मेगाभरती, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यानंतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात एसईबीसी’चा प्रवर्ग वगळून संबंधितांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय झाला. आता मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के पदांची भरती करतानाही हा फॉर्म्यूला वापरला जाणार आहे. तिन्ही विभागात एकूण दहा हजारांपर्यंत पदांची भरती केली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.

 

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार तिन्ही विभागांना पाठविले पत्र

वित्त विभागाच्या परवानगीनंतर मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के जागा (एसईबीसी वगळून) भरतीस मान्यता मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित विभागांनी पदभरतीची कार्यवाही करावी, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाने पाठविले आहे.

मेगाभरतीच्या अनुषंगाने राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या आदेशात आता सुधारणा केली जाणार आहे. एसईबीसी’ प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गासह अन्य संवर्गातून पदांची भरती केली जाणार आहे. दुसरीकडे या विभागातील रिक्‍त पदांसाठी ज्या उमेदवारांनी ‘एसईबीसी’ या प्रवर्गातून अर्ज केले आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातून परीक्षा देण्याचा पर्याय खुला करुन दिला जाणार असल्याचेही सामान्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागांमधील नव्या पदभरतीला वित्त विभागाने मान्यता दिलेली नाही. राज्यातील सर्वच शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांची संख्या आता सव्वादोन लाखांवर पोहचली आहे. त्यापैकी अत्यावश्‍यक असलेल्या तीन विभागांमधील 50 टक्‍के पदांची भरती प्रक्रिया आता 15 दिवसांत सुरु केली जाणार आहे.

राज्यातील 29 सरकारी विभाग व जिल्हा परिषदांमध्ये तब्बल सव्वादोन लाख रिक्‍त पदे
गृह, सार्वजनिक आरोग्य विभागांमधील रिक्‍त पदांची संख्या 46 हजारांवर
वित्त विभागाच्या मान्यतेनंतर पहिल्या टप्प्यात 10 ते 12 हजार पदांची होईल भरती
‘एसईबीसी’ प्रवर्ग वगळून अन्य संवर्गातील पदांची होणार पदभरती; आरक्षणाच्या अंतरिम निर्णयानंतर होईल बदल
सामान्य विभागाच्या पत्रानंतर मेडिकल, सार्वजनिक आरोग्य व पोलिस विभागांची पदभरतीच्या दृष्टीने सुरु केली तयारी

 

 


सोर्स: सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The good news is that mega recruitment will start soon!

By Naukari Adda Team


After the Maratha reservation was granted a stay by the Supreme Court, admission in mega recruitment and educational institutions was hampered. It was then decided to exclude SEBC's category from the open category for admission in educational institutions. The formula will now be used to fill 50 per cent of the total vacancies in the medical, police and public health departments. A total of 10,000 posts will be filled in the three departments, the general administration department said.

Letters sent to all the three departments as per the decision of the Cabinet

With the permission of the Finance Department, 50 per cent of the total vacancies in the Medical, Police and Public Health Departments (excluding SEBC) have been sanctioned. Against this background, as per the decision taken by the Cabinet, the concerned departments should take action for recruitment, a letter has been sent by the General Administration Department.

An earlier order issued by the state government in connection with the mega-recruitment will now be amended. Apart from SEBC's category, posts will be recruited from other categories including open category. On the other hand, senior officials in the general administration said that the candidates who have applied for the vacant posts in the department from the 'SEBC' category will be given the option to appear for the examination from the open category. Corona, on the other hand, has not approved new appointments in any of the departments except the medical, police and public health departments as the state's financial situation has deteriorated. The number of vacancies in all government departments in the state has now reached over two and a half lakh. The recruitment process for 50 per cent of the posts in the three most urgent departments will now begin in 15 days.

Twelve lakh vacancies in 29 government departments and Zilla Parishads in the state
The number of vacancies in Home and Public Health Departments is over 46 thousand
In the first phase, after the approval of the finance department, recruitment will be for 10 to 12 thousand posts
Recruitment of posts in other categories except ‘SEBC’ category; Changes will follow the interim decision of the reservation
Following the letter from the general department, preparations were started for the recruitment of medical, public health and police departments


Source: Sakal 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda