पाकिस्तानातून आले भारतात, 5वी पास असूनही उभारला कोटींचा व्यवसाय! असा होता 'MDH वाले दादाजीं'चा प्रवास

By Naukari Adda Team


पाकिस्तानातून आले भारतात, 5वी पास असूनही उभारला कोटींचा व्यवसाय! असा होता

2020 या वर्षातील आणखी एक दु:खदायक घटना आज घडली आहे. MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. पहाटे 5.38 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.

काही दिवसांपूर्वी गुलाटी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज 'फेटेवाले आजोबा' म्हणून घराघरात धर्मपाल गुलाटी पोहोचले आहेत. वर्षानुवर्षे MDH ची अनेक उत्पादनं घराघरात पाहायला मिळतात. पाकिस्तानातून भारतात आलेले कुटुंब, वडिलांचा मसाल्याचा व्यवसाय एवढच नव्हे तर कुटुंबासाठी टांगाचालकाचं केलेलं काम.. असे अनेक चढउतार महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या आयुष्यात आले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत माहित नसलेल्या या गोष्टी

धर्मपाल यांच्या वडिलांनी सियालकोट (आता पाकिस्तानात) मध्ये 1919मध्ये मसाल्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता. फाळणीनंतर गुलाटी कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले. तेव्हा सुरुवातीला त्यांनी उपजिविकेसाठी टांगाही चालवला होता. त्यानंतर करोलबाग इथं एका लाकडाच्या लहानश्या पेटील मसाले विकायला सुरूवात केली. तेव्हापासून तो व्यवसाय वाढतच गेला.

धर्मपाल हे एमडीएच मसाल्याचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर देखील होते. गेली अनेक वर्ष ते कंपनीच्या मसाल्यांचे ब्रॅण्डींग करत होते. त्यांच्या जाहिरातींना उत्तम प्रतिसादही मिळतो. एमडीएच मसाल्याच्या प्रत्येक पाकिटावर तुम्ही या आजोबांचा फोटो पाहिलाच असेल.

फक्त पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या या आजोबांनी बड्या बड्या उद्योगपतींना मागे टाकत 2017 मध्ये देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला होता.

'एमडीएच'ची वार्षिक उलाढाल 1500 कोटींच्याही वर आहे. त्यांच्या कंपनीकडे 15 कारखाने असून 1000 डिलर्सचं जाळं आहे.

महाशय धर्मपाल गुलाटींना त्यांच्या मसाले उद्योग क्षेत्रातील यशासाठी मार्च 2019 मध्ये 'पद्म भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार धर्मपाल गुलाटी यांना प्रदान करण्यात आला होता.

एमडीएचची सुरुवात छोट्या स्तरपासून झाली असली तरी कंपनीचा आजचा व्याप प्रचंड मोठा आहे. देशातल्या मसाला बाजारात कंपनीचा वाटा 12 टक्के आहे. कंपनी 62 प्रकारची उत्पादनं तयार करते. ही सर्व उत्पादनं 150 पॉकेट्समध्ये उपलब्ध आहेत.धर्मपाल गुलाटी हेच कंपनीचे सीईओ आहेत. त्याचं वार्षिक वेतन पाहून कुणालाही आर्श्चयाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तीन वर्षांपूर्वी त्यांचं वार्षिक वेतन हे 24 कोटी रुपये होतं. त्याचबरोबर कंपनीत त्यांचा 80 टक्के हिस्साही आहे. आपल्या वेतनामधला 90 टक्के हिस्सा आपण सामाजिक कार्यासाठी देतो असा त्यांचा दावा आहे.

डोक्यावर खास फेटा आणि रूबाबदार राहणी हे धर्मपाल यांचं खास वैशिष्ट्यं. त्यामुळेच त्यांना एमडीएच वाले दादाजी असंही म्हणतात. तर काही लोक त्यांना महाशय या नावानेही ओळखतात.

धर्मपाल यांनी गेल्या 60 वर्षांमध्ये दिल्लीत 20 शाळा आणि अनेक हॉस्पिटल्स उघडली आहेत. त्यांची कंपनी कंत्राटी शेतीही करते. त्यात मसाल्याची उत्पादनं घेतली जातात. कर्नाटक, राजस्थान त्याचबरोबर इराण आणि अफगाणिस्तामधूनही त्यांची कंपनी मसाल्यासाठीचा माल खरेदी करते.

धर्मपाल यांना एक मुलगा आणि सहा मुली आहेत. मुलगा हा आता सगळा व्यवहार सांभाळतो. तर सहा मुली विभागवार कंपनीचा वितरण व्यवसाय सांभाळतात.

धर्मपाल यांचं शिक्षण फक्त पाचवी पर्यंतच झालं आहे. वडिलांपेक्षा वेगळा व्यवसाय करून त्यांना यशस्वी व्हायचं होतं. त्यामुळं त्यांनी अनेक व्यवसाय करून बघितले. पण त्यांना यश आलं नाही.

आर्यसमाजाचे अनुयायी - धर्मपाल गुलाटी हे आर्यसमाजाचे कट्टर अनुयायी आहेत. राजधानी नवी दिल्लीत त्यांच्याच पुढाकाराने 2018 मध्ये विश्व आर्यसमाज संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात जगभरातल्या अनेक देशांमधून आर्यसमाजचे अनुयायी आले होते.

वर्षभरापूर्वी धर्मपाल यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. अनेक प्रसार माध्यमांकडून बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. यामुळे त्यांच्या कुटूंबीयांना खूप मनस्तापही सहन करावा लागला. त्यानंतर धर्मपाल यांनी स्वतः एका व्हिडीओद्वारे आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं होतं.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Came from Pakistan to India, despite 5th pass, built a business worth crores! Such was the journey of 'Grandpa with MDH'

By Naukari Adda Team


Another tragic event of the year 2020 has happened today. MDH owner Mahasaya Dharmapal Gulati has passed away. He breathed his last at around 5.38 am. He died at the age of 98.

Gulati was infected with corona a few days ago. Mahasaya Dharmapal had suffered a heart attack after recovering from Corona. His condition then deteriorated and he breathed his last on Thursday morning.

Today, Dharmapal Gulati has reached every household as 'Fetewale Ajoba'. Over the years, many MDH products have been found in homes. The family who came to India from Pakistan, not only the father's spice business but also the work done by the leg driver for the family .. There have been many ups and downs in the life of Mahasaya Dharmapal Gulati. Let us know these things that we do not know about them

Dharmapal's father started a small spice business in 1919 in Sialkot (now in Pakistan). After partition, the Gulati family settled in Delhi. Initially, he even used his legs to make a living. He then started selling small wooden spices at Karol Bagh. Since then, the business has grown.

Dharmapal was also the brand ambassador of MDH Spices. For the past several years, he has been branding the company's spices. Their ads also get great response. You may have seen this grandfather's photo on every packet of MDH spices.

Educated only up to the fifth grade, the grandfather surpassed the big industrialists to become the richest CEO in the country in 2017.

MDH has an annual turnover of over Rs 1,500 crore. His company has 15 factories and a network of 1000 dealers.

Mahasaya Dharmapal Gulati was awarded the Padma Bhushan in March 2019 for his achievements in the spice industry. The award was presented to Dharmapal Gulati by President Ramnath Kovind.

Although MDH started small, the company's reach today is huge. The company has a market share of 12 per cent in the country's spice market. The company manufactures 62 types of products. All these products are available in 150 pockets. Dharmapal Gulati is the CEO of the company. No one will be surprised to see his annual salary. Three years ago, his annual salary was Rs 24 crore. He also owns 80 per cent stake in the company. They claim that 90 percent of their salary is for social work.

Dharmapala's special features are the special feta on his head and the rubabdar living. That is why he is also called MDH Wale Dadaji. Some people even call him Mahasaya.

Dharmapal has opened 20 schools and several hospitals in Delhi in the last 60 years. His company also does contract farming. It contains spices. His company buys spices from Karnataka, Rajasthan as well as Iran and Afghanistan.

Dharmapal has a son and six daughters. The boy now handles all the transactions. Six girls run the company's distribution business.

Dharmapal's education is only up to the fifth grade. He wanted to be successful by doing a different business than his father. So he tried to do a lot of business. But they did not succeed.

Followers of Arya Samaj - Dharmapal Gulati is a staunch follower of Arya Samaj. The World Arya Samaj Sammelan was organized in 2018 in the capital New Delhi on his initiative. The meeting was attended by followers of Arya Samaj from many countries around the world.

Dharmapal's death was rumored a year ago. The news was being broadcast by several media outlets. This caused a lot of heartache to his family. After that, Dharmapal himself had said in a video that he was in good health.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda