प्राध्यापक भरती MPSC मार्फत करा

By Naukari Adda Team


प्राध्यापक भरती MPSC मार्फत करा, Recruit professors through MPSC

महाविद्यालयात एखाद्या विषयाची जागा निघाली की त्यासाठी लाखो  रुपयांचा रेट ठरतो. ठराविक उमेदवाराला नोकरी मिळावी म्हणून तडजोडी सुरू होतात. अनेक गुणवंत पात्रताधारक शेतीबाडी विकून पैसे द्यायला तयार होतात, पण ज्यांच्याकडे काहीच नाही ते या स्पर्धेत टिकत देखील नाहीत. प्राध्यापक भरती प्रक्रियेच्या नियमात पारदर्शकता आणा आणि महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) प्राध्यापक भरती करा या मागणीने जोर धरला आहे. 

महाराष्ट्र सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल करण्यासाठी समिती गठित केली आहे. त्यावर सूचना देण्यासाठी १३ डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सेट, नेट, पीएचडी पात्रताधारक तरुण पुन्हा एकदा प्राध्यापक भरतीत पारदर्शकता आणावी यासाठी प्रयत्न करत आहेत.

विवेक नागरगोजे म्हणाले, “प्राध्यापक भरतीत पारदर्शकता नसल्याने प्रचंड भ्रष्टाचार होतो, त्यामुळे गुणवत्ता असलेले उमेदवार वंचित रहातात. सरकारने विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून त्वरीत एपीएससीमार्फत प्राध्यापक भरती सुरू करावी. राज्यातील अनेक तरुणांनी याबाबत समितीकडे सूचना कराव्यात असे आवाहन केले आहे.”

महाराष्ट्र राज्य प्राध्यापक भरती संघर्ष कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष मनोज मुनेश्वर म्हणाले, ‘यूजीसी’ने भरती पारदर्शकपणे करावी असे निर्देश दिले आहेत, पण राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. बहुसंख्य संस्था राजकारणी लोकांच्या आहेत, त्यांना भरतीतून पैसा मिळतो त्यामुळे यात सुधारणा केल्या जात नाहीत, असा आरोपही मुनेश्वर यांनी केला.

 

 

 सोर्स:सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruit professors through MPSC

By Naukari Adda Team


If a subject is offered in a college, the rate is lakhs of rupees. Compromises begin to get a particular candidate a job. Many qualified people are willing to sell their farms to make money, but those who have nothing do not even compete. The demand for transparency in the rules of recruitment process and recruitment of professors by the Maharashtra Public Service Commission (MPSC) by amending the Maharashtra University Act has been emphasized.

The Maharashtra government has constituted a committee to amend the University Act. The deadline for giving notice is December 13. Therefore, young people with SET, NET, PhD qualifications are once again trying to bring transparency in the recruitment of professors.

Vivek Nagargoje said, “Lack of transparency in the recruitment of professors leads to huge corruption, so quality candidates are deprived. The government should immediately start recruitment of professors through APSC by amending the University Act. Many youths in the state have appealed to the committee to take up the matter. ”

Manoj Muneshwar, executive chairman of the Maharashtra State Professor Recruitment Struggle Action Committee, said the UGC had directed that recruitment should be done in a transparent manner, but the state government was ignoring it. Muneshwar also alleged that the majority of the institutions belong to politicians, they get money from recruitment so they are not reformed.

 

 

Source: Sakal


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda