शरद पवारांचा 80 वा वाढदिवस, 80 हजार तरुणांना राष्ट्रवादी देणार नोकऱ्या!

By Naukari Adda Team


शरद पवारांचा 80 वा वाढदिवस, 80 हजार तरुणांना राष्ट्रवादी देणार नोकऱ्या!, Sharad Pawar

मुंबई, 08 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा 12 डिसेंबरला 80 वा वाढदिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाढदिवसाची जंगी तयारी सुरू आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 80 हजार तरुणांना रोजगार देणार अशी घोषणाच राज्याचे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 80 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती  नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

दिनांक 7 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत rojgar.mahaswayam.gov.in आणि yodhaat80.org या दोन संकेतस्थळावर नोकरी देणारे आणि नोकरी हवी असणारे लोकं नोंदणी करू शकतात. तसंच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जिल्हा स्तरावर नोंदणी करण्याचा उपक्रम राबविणार आहेत.  त्यानंतर 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाइन मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी दिल्या जातील, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

7 डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी 214 कंपन्यांनी उपक्रमामध्ये नोंदणी केली आहे. 80 हजार तरुणांना रोजगार दिला जाईलच. पण हा आकडा आणखी जास्त वाढण्याची शक्यता आहे. कारण, कंपन्यांची मागणी अधिक असल्यामुळे हा आकडा एक लाखाच्यावरही  जाऊ शकतो, असंही  मलिक यांनी सांगितले.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून रक्तदान शिबिरे'

दरम्यान, राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिरं घेण्यासंदर्भात जयंत पाटील यांना पत्र लिहिलं असून या रक्तदान शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा होईल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. 'राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या शिल्लक असून रक्तदान वाढवणं गरजेचं असल्याचं देखील टोपे म्हणाले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Sharad Pawar's 80th birthday, NCP will give jobs to 80,000 youth!

By Naukari Adda Team


Mumbai, Dec 8: NCP President Sharad Pawar's 80th birthday falls on December 12. Therefore, the NCP is preparing for his birthday. The state's Skill Development and Employment Minister Nawab Malik has announced that 80,000 youths will be employed on Sharad Pawar's birthday.

Nawab Malik informed at a press conference that on the occasion of the 80th birth anniversary of National President of NCP Hon'ble MP Sharad Pawar, 80,000 youths would be provided employment through online job fair through NCP and State Skill Development Department.

From 7th to 12th December 2020, job seekers and job seekers can register on two websites, rojgar.mahaswayam.gov.in and yodhaat80.org. Also, NCP Youth Congress workers will implement registration at the district level. Thereafter, employment opportunities will be provided through online interviews on 12 and 13 December 2020, Nawab Malik clarified.

On the first day of December 7, 214 companies have registered for the venture. 80,000 youth will be provided employment. But that number is likely to rise further. This is because the demand from companies is high and the number could go up to one lakh, Malik said.

Blood donation camps by the party on the occasion of Sharad Pawar's birthday '

Meanwhile, on the occasion of Sharad Pawar's birthday, the NCP has written a letter to Jayant Patil to conduct blood donation camps in every taluka of the state to fill the blood shortage in the state. "There is enough blood stock in the state for 5 to 6 days and there is a need to increase blood donation," Tope said.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda