इंजिनीअरिंग फार्मसी आणि अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

By Naukari Adda Team


इंजिनीअरिंग फार्मसी आणि अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, Beginning of admission process for Engineering Pharmacy and other courses

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनीअरिंग (बीई) आणि फार्मसी पदवी (बीफार्म) अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना आज ९ डिसेंबर बुधवारपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. इंजिनीअरिंगसाठी १५ डिसेंबरपर्यत नोदणी, तर १६ डिसेंबरपर्यत कागदपत्रांची पडताळणी व अर्जाचे कन्फर्मेशन करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे फार्मसीसाठी १४ डिसेंबरपर्यत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. तर, १५ डिसेंबरपर्यत कागदपत्रांची पडताळणी व अर्जाचे कन्फर्मेशन करावे लागणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार इंजिनीअरिंगसाठी १५ डिसेंबरनंतर नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचार 'नॉन कॅप'साठी करण्यात येणार आहे. तर, फार्मसीसाठी १४ डिसेंबरपर्यत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार 'नॉन कॅप'साठी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती; तसेच वेळापत्रक सीईटी सेलच्या www.mahacet.org वेबसाइटवर उपलब्ध आहे, अशी माहिती सेलकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रथम वर्ष फार्मसी पदवी अभ्यासक्रम वेळापत्रक

अर्ज नोंदणी - ९ ते १४ डिसेंबर
कागदपत्रे पडताळणी व कन्फर्मेशन - ९ ते १५ डिसेंबर
प्राथमिक गुणवत्ता यादी - १७ डिसेंबर
आक्षेप नोंदवणे - १८ व १९ डिसेंबर
अंतिम गुणवत्ता यादी - २१ डिसेंबर
प्रवेशक्षमता जाहीर होणे - २१ डिसेंबर
पहिल्या फेरीसाठी पर्याय निवडणे - २२ ते २४ डिसेंबर
निवड यादी जाहीर होणे - २७ डिसेंबर
प्रवेश निश्चिती - २८ ते ३० डिसेंबर
कागदपत्रे व शुल्क जमा करणे - २८ ते ३० डिसेंबर
दुसऱ्या फेरीसाठी प्रवेशक्षमता जाहीर - ३१ डिसेंबर
कॉलेजांचे पर्याय निवडणे - १ ते ३ जानेवारी
निवड यादी जाहीर - ५ जानेवारी

प्रवेश निश्चिती - ६ ते ८ जानेवारी
कागदपत्रे व शुल्क जमा करणे - ६ ते ८ जानेवारी
शैक्षणिक वर्षाला सुरुवात - ४ जानेवारी
कट ऑफ तारीख - १४ जानेवारी

प्रथम वर्ष इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रम वेळापत्रक

अर्ज नोंदणी - ९ ते १५ डिसेंबर
कागदपत्रे पडताळणी व कन्फर्मेशन - ९ ते १६ डिसेंबर
प्राथमिक गुणवत्ता यादी - १८ डिसेंबर
आक्षेप नोंदवणे - १९ व २० डिसेंबर
अंतिम गुणवत्ता यादी - २२ डिसेंबर
प्रवेशक्षमता जाहीर होणे - २२ डिसेंबर
पहिल्या फेरीसाठी पर्याय निवडणे - २३ ते २५ डिसेंबर
निवड यादी जाहीर होणे - २८ डिसेंबर
प्रवेश निश्चिती - २९ ते ३१ डिसेंबर
कागदपत्रे व शुल्क जमा करणे - २९ ते ३१ डिसेंबर
दुसऱ्या फेरीसाठी प्रवेशक्षमता जाहीर - १ जानेवारी २०२१
कॉलेजांचे पर्याय निवडणे - २ ते ४ जानेवारी
निवड यादी जाहीर - ६ जानेवारी
प्रवेश निश्चिती - ७ ते ९ जानेवारी
कागदपत्रे व शुल्क जमा करणे - ७ ते ९ जानेवारी

शैक्षणिक वर्षाला सुरुवात - ४ जानेवारी
कट ऑफ तारीख - १४ जानेवारी

 

थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया जाहीर

सीईटी सेलकडून थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग पदवी प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज बुधवार ९ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तर, अंतिम मुदत १४ डिसेंबर आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी; तसेच अर्जाचे कन्फर्मेशन १५ डिसेंबरपर्यत करायचे आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी १७ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. यादीबाबत विद्यार्थ्यांना १८ व १९ डिसेंबर रोजी आक्षेप नोंदवता येईल. त्यानंतर २१ रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन, विद्यार्थ्यांना २२ ते २४ डिसेंबर दरम्यान कॉलेजांचे पर्याय निवडता येईल. निवड यादी २८ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यावर, विद्यार्थ्यांना २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान प्रवेश निश्चिती करायची आहे. याच कालावधीत कॉलेजमध्ये कागदपत्रे व शुल्क जमा करुन प्रवेश घ्यायाचा आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला १ जानेवारी २०२१ ला सुरुवात होईल.
 

थेट द्वितीय वर्ष फार्मसी पदवी प्रवेश प्रक्रिया जाहीर

सीईटी सेलकडून थेट द्वितीय वर्ष फार्मसी पदवी प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज बुधवार ९ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तर, अंतिम मुदत १४ डिसेंबर आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी; तसेच अर्जाचे कन्फर्मेशन १५ डिसेंबरपर्यत करायचे आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी १७ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. यादीबाबत विद्यार्थ्यांना १८ व १९ डिसेंबर रोजी आक्षेप नोंदवता येईल. त्यानंतर २१ रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन, विद्यार्थ्यांना २२ ते २४ डिसेंबर दरम्यान कॉलेजांचे पर्याय निवडता येईल. निवड यादी २७ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यावर, विद्यार्थ्यांना २८ ते ३० डिसेंबर दरम्यान प्रवेश निश्चिती करायची आहे. याच कालावधीत कॉलेजमध्ये कागदपत्रे व शुल्क जमा करुन प्रवेश घ्यायाचा आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला ३१ डिसेंबरला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Beginning of admission process for Engineering Pharmacy and other courses

By Naukari Adda Team


The State Common Entrance Examination Cell (CET Cell) has announced the admission process for the Engineering (BE) and Pharmacy Degree (B.Pharm) courses, according to which students will have to register online from Wednesday, December 9. For engineering, registration will have to be done by December 15, while verification of documents and confirmation of application will have to be done by December 16. Similarly, online registration for pharmacy has to be done till 14th December. The CET cell has informed that the documents have to be verified and the application has to be confirmed by December 15. According to the schedule published by the CET cell, students who register for engineering after December 15 will be considered for 'non-cap'. It has been clarified that students who register for pharmacy till December 14 will be considered for non-cap. Details of the admission process; The schedule is also available on the CET Cell's website at www.mahacet.org.

First year pharmacy degree course schedule

Application Registration - 9th to 14th December
Document Verification and Confirmation - 9th to 15th December
Primary Quality List - 17th December
Objection to be lodged - 18th and 19th December
Final quality list - 21st December
Admission is announced - 21st December
Opting for the first round - 22nd to 24th December
Selection List Announced - 27th December
Admission Confirmation - 28th to 30th December
Submission of documents and fees - 28th to 30th December
Admission for the second round announced - 31st December
Choosing college options - 1st to 3rd January
Selection list announced - 5th January

Admission confirmation - 6th to 8th January
Submission of documents and fees - 6th to 8th January
Beginning of the academic year - 4th January
Cut-off date - 14th January

First year engineering degree course schedule

Application Registration - 9th to 15th December
Document Verification and Confirmation - 9th to 16th December
Primary Quality List - 18th December
Filing of Objections - 19th and 20th December
Final quality list - 22nd December
Admission is announced on 22nd December
Opting for the first round - 23rd to 25th December
Selection List Announced - 28th December
Admission Confirmation - 29th to 31st December
Submission of documents and fees - 29th to 31st December
Admission for the second round announced - January 1, 2021
Choosing college options - 2nd to 4th January
Selection list announced - January 6
Admission confirmation - 7th to 9th January
Submission of documents and fees - 7th to 9th January

Beginning of the academic year - 4th January
Cut-off date - 14th January

Directly announced the second year engineering admission process

The online admission process for the second year engineering degree from CET Cell will start from Wednesday, December 9. So, the deadline is December 14. As well as verification of documents; Also, the application has to be confirmed by December 15. The preliminary merit list will be published on December 17. Students can file objections to the list on December 18 and 19. After that, the final merit list will be announced on the 21st and students will be able to choose the colleges between 22nd and 24th December. Once the selection list is announced on December 28, students have to confirm admission between December 29 and 31. During this period, admission in the college is required by submitting documents and fees. After that, the second round will start on January 1, 2021.


Directly announced the second year pharmacy degree admission process

The online admission process for the second year pharmacy degree from CET Cell will start from Wednesday, December 9. So, the deadline is December 14. As well as verification of documents; Also, the application has to be confirmed by December 15. The preliminary merit list will be published on December 17. Students can file objections to the list on December 18 and 19. After that, the final merit list will be announced on the 21st and students will be able to choose the colleges between 22nd and 24th December. Once the selection list is announced on December 27, students have to confirm admission between December 28 and 30. During this period, admission in the college is required by submitting documents and fees. After that, the second round will start on December 31, the CET cell has clarified.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda