बोर्डाने केलं सावध ; CBSE दहावी, बारावी परीक्षांच्या बनावट तारखा

By Naukari Adda Team


बोर्डाने केलं सावध ; CBSE दहावी, बारावी परीक्षांच्या बनावट तारखा, The board did caution; Fake dates of CBSE 10th, 12th exams

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) गुरुवारी एक परिपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि पालकांना सावध करणारं हे परिपत्रक आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी आणप प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखांसंदर्भात एक बनावट नोटीस व्हायरल झाली आहे. ही माहिती अयोग्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये परीक्षांसंदर्भात नाहक घबराट पसरली आहे.

सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी गुरुवारी बोर्डाचे अधिकृत परिपत्रक काढून दहावी, बारावी परीक्षांसंदर्भत सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर, परीक्षांच्या तारखांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. ही व्हायरल माहिती चुकीची आहे, आणि त्यामुळे उगीचच विद्यार्थी-पालकांमध्ये काळजीचं वातावरण आहे, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

बोर्डाने सर्व संलग्न शाळा, विद्यार्थी-पालक, अन्य संबंधितांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. सीबीएसई बोर्डासंदर्भातील कोणत्याही अधिकृत माहितीसाठी विद्यार्थी, पालकांनी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन बोर्डाने केलं आहे.

सीबीएसईच्या परिपत्रकात म्हटलं आहे की, ‘करोना महामारी काळात विद्यार्थी-पालकांच्या स्थितीबाबत सीबीएसई बोर्डाला जाणीव आहे. म्हणूनच कोणताही निर्णय बोर्डाने घेतला तर तो संबंधितांशी विचार विनिमय करूनच घेतला जाईल आणि त्याबाबत बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाईल.’

 

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The board did caution; Fake dates of CBSE 10th, 12th exams

By Naukari Adda Team


The Central Board of Secondary Education (CBSE) on Thursday issued a circular. This is a circular warning students, teachers, schools and parents. A fake notice has gone viral regarding the dates of CBSE Board's 10th and 12th written and practical exams. This information is inaccurate and has caused undue panic among students and parents.

CBSE Board of Controller of Examinations Dr. Sanyam Bharadwaj on Thursday issued an official circular to the board urging them not to believe any rumors circulating on social media regarding the 10th and 12th exams. The circular states that this viral information is incorrect, and therefore there is an atmosphere of concern among students and parents.

The board has appealed to all affiliated schools, students-parents and others concerned not to believe such rumors. The Board has appealed to the students and parents to visit the official website of the CBSE Board for any official information regarding the Board.

The CBSE circular states, "The CBSE Board is aware of the plight of students and parents during the Corona epidemic." Therefore, if any decision is taken by the Board, it will be taken in consultation with the concerned and it will be informed on the official website of the Board from time to time. 

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda