अल्पसंख्याक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण

By Naukari Adda Team


अल्पसंख्याक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण, Minority youth, women will get skill development training

मुंबई, राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना स्थानिक व्यावसायिक आणि औद्योगिक गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटी रुपये खर्च होणार असून आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल;अशी माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

बँकींग, हेल्थ केअर, लॉजिस्टीक्स अशी विविध प्रशिक्षणे 
 मुस्लिम ख्रिश्चन शीख,बौद्ध,पारशी,जैन आणि ज्यू समुदायातील 15 ते 45 वयोगटातील युवक आणि महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. बँकींग आणि टॅक्स असिस्टंट,;हेल्थ केअर,बांधकाम,;लॉजिस्टीक्स,;कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर,;ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया (असिस्टंट कॅमेरामन);ऑटोमोबाईल,;मोटार मेकॅनिक हेवी व्हेईकल,;रोड रोलर ड्रायव्हर,;जेसीबी ड्रायव्हर यांसह स्थानिक व्यवसाय,;स्थानिक उद्योग यांच्या गरजांनुसार हे प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण साधारण 300 ते 600 तासांचे असेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत संस्थांची निवड करुन त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थांची निवड लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ही प्रशिक्षणे सुरु करण्यात येतील. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे;असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण 

जिल्ह्यांमधील अल्पसंख्याक समुदायातील 15 ते 45 वयोगटातील युवक आणि महिलांच्या लोकसंख्येच्या आधारे त्या-त्या जिल्ह्यांमधील प्रशिक्षणांच्या बॅच आणि उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक बॅचमध्ये साधारण 30 उमेदवार असतील. त्यानुसार मुंबई उपनगरात 50 बॅचमध्ये एक हजार 509 उमेदवार,;ठाणे जिल्ह्यात 35 बॅचमध्ये एक हजार 070 उमेदवार,;औरंगाबाद जिल्ह्यात 21 बॅचमध्ये 637 उमेदवार,पुणे जिल्ह्यात 20;बॅचमध्ये 618 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 19 बॅचमध्ये 573 उमेदवार,;नागपूर जिल्ह्यात 19 बॅचमध्ये 568 उमेदवार,नांदेड जिल्ह्यात 17 बॅचमध्ये 510 उमेदवार,;नाशिक जिल्ह्यात 16 बॅचमध्ये 482 उमेदवार,;अमरावती जिल्ह्यात 15 बॅचमध्ये 467 उमेदवार,;जळगाव जिल्ह्यात 14 बॅचमध्ये 428 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 14 बॅचमध्ये 414 उमेदवार,;अकोला जिल्ह्यात 13 बॅचमध्ये 407 उमेदवार,;परभणी जिल्ह्यात 10 बॅचमध्ये 298 उमेदवार,;यवतमाळ जिल्ह्यात 9 बॅचमध्ये 280 उमेदवार, ;सोलापूर जिल्ह्यात 9 बॅचमध्ये 278 उमेदवार,लातूर जिल्ह्यात 9 बॅचमध्ये 260 उमेदवार,;जालना जिल्ह्यात 8 बॅचमध्ये 251 उमेदवार,;कोल्हापूर जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 231 उमेदवार,;बीड जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 226 उमेदवार,;अहमदनगर जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 217 उमेदवार,;चंद्रपूर जिल्ह्यात 7 बॅचमध्ये 211 उमेदवार,;रायगड जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 194 उमेदवार, ;वाशिम जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 187 उमेदवार,;हिंगोली जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 182 उमेदवार,;सांगली जिल्ह्यात 6 बॅचमध्ये 179 उमेदवार,;रत्नागिरी जिल्ह्यात 5 बॅचमध्ये 152 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 5 बॅचमध्ये 149 उमेदवार, धुळे जिल्ह्यात 4 बॅचमध्ये 123 उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 बॅचमध्ये 120 उमेदवार,;वर्धा जिल्ह्यात 4 बॅचमध्ये 116 उमेदवार,;भंडारा जिल्ह्यात 3 बॅचमध्ये 89 उमेदवार,;नंदुरबार जिल्ह्यात 3 बॅचमध्ये 83 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 3 बॅचमध्ये 79 उमेदवार,;गडचिरोली जिल्ह्यात 2 बॅचमध्ये 75 उमेदवार,;पालघर जिल्ह्यात 2 बॅचमध्ये 69 उमेदवार तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात 1 बॅचमध्ये 33 उमेदवार याप्रमाणे एकूण 11 हजार 764 उमेदवारांना 

प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक उमेदवाराला दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रत्येकी सुमारे 17 हजार रुपये खर्च होणार आहे,;असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

 प्रशिक्षण संपल्यानंतर उमेदवारांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येईल. तसेच उमेदवारांना सेक्टर स्किल कौन्सील यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

 

 

 

सोर्स:महासंवाद


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Minority youth, women will get skill development training

By Naukari Adda Team


In order to provide employment to the youth and women from the minority communities in Mumbai, they will be imparted skill development training as per the local business and industrial needs. It will cost Rs 20 crore and necessary provision has been made. This year, 11 thousand 764 candidates will be trained in the first phase. A government decision has been issued in this regard and the scheme will be implemented effectively in the state, said Skills Development and Minority Development Minister Nawab Malik.

Various trainings like banking, health care, logistics
The training will be imparted to youth and women in the age group of 15 to 45 years from Muslim, Christian, Sikh, Buddhist, Parsi, Jain and Jewish communities. Banking and Tax Assistant, Healthcare, Construction, Logistics, Computer Software and Hardware, Animation and Multimedia (Assistant Cameraman), Automobile, Motor Mechanic, Heavy Vehicle, Road Roller Driver, JCB Driver; The training will be tailored to the needs of the local industry. This training will be about 300 to 600 hours. The training will be imparted through the Maharashtra State Skill Development Society by selecting the institutes registered on the Skill India portal. Institutions have been instructed to select the candidates as soon as possible, after which the trainings will be started based on the situation in Corona. The scheme is being implemented by the Minority Development Department; Malik said.

Training of 11 thousand 764 candidates in the first phase

The number of training batches and candidates in the districts is determined on the basis of the population of youth and women in the age group of 15 to 45 years from the minority communities in the districts. Each batch will have about 30 candidates. Accordingly, 1,509 candidates in 50 batches in Mumbai suburbs, 1,070 candidates in 35 batches in Thane district, 637 candidates in 21 batches in Aurangabad district, 20 candidates in Pune district, 618 candidates in batches, 573 candidates in 19 batches in Mumbai city district and 568 candidates in 19 batches in Nagpur district. 510 candidates in 17 batches in Nanded district, 482 candidates in 16 batches in Nashik district, 467 candidates in 15 batches in Amravati district, 428 candidates in 14 batches in Jalgaon district, 414 candidates in 14 batches in Buldhana district, 407 candidates in 13 batches in Akola district, Parbhani 298 candidates in 10 batches in the district, 280 candidates in 9 batches in Yavatmal district, 278 candidates in 9 batches in Solapur district, 260 candidates in 9 batches in Latur district, 251 candidates in 8 batches in Jalna district, 231 candidates in 7 batches in Kolhapur district and 7 batches in Beed district. 226 candidates, 217 candidates in 7 batches in Ahmednagar district, 211 candidates in 7 batches in Chandrapur district, 194 candidates in 6 batches in Raigad district, 187 candidates in 6 batches in Washim district, 6 batches in Hingoli district 182 candidates in 6 batches in Sangli district, 179 candidates in 6 batches, 152 candidates in 5 batches in Ratnagiri district, 149 candidates in 5 batches in Satara district, 123 candidates in 4 batches in Dhule district, 120 candidates in 4 batches in Osmanabad district, 116 candidates in 4 batches in Wardha district. 89 candidates in 3 batches in Bhandara district, 83 candidates in 3 batches in Nandurbar district, 79 candidates in 3 batches in Gondia district, 75 candidates in 2 batches in Gadchiroli district, 69 candidates in 2 batches in Palghar district and 33 candidates in 1 batch in Sindhudurg district for a total of 11 thousand 764 candidates.

Training will be given. It will cost around Rs. 17,000 for each candidate to get quality training, said the Minister. Malik said.

After the completion of the training, action will be taken by the concerned training institute to provide employment or self-employment to the candidates. Candidates will also be given certificates through Sector Skill Council.

 

 

Source: Mahasavvad


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda