एमबीए प्रवेश प्रक्रिया पुन्हा स्थगित

By Naukari Adda Team


एमबीए प्रवेश प्रक्रिया पुन्हा स्थगित, MBA admission process postponed again

व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी) किंवा केंद्रीय प्रवेश परीक्षाच (कॅट, सीमॅट) प्रवेशासाठी ग्राह्य धरण्याचा सरकारचा निर्णय लागू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सीईटी सेलने एमबीएची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारच्या सूचनांनंतर पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येतील, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

गतवर्षीपर्यंत खासगी संस्था, संस्थांच्या संघटना यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या अ‍ॅटमा, सॅट, मॅट यांसारख्या अनेक परीक्षांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येत होते. परंतु गतवर्षी सुमारे ४० विद्यार्थ्यांनी खासगी संस्थांच्या परीक्षांची खोटी गुणपत्रके जोडून नामवंत संस्थांमध्ये प्रवेश घेतल्याचे उघड झाले होते. त्यामुळे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी, कॅट, सीमॅट या परीक्षांचेच गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, हा निर्णय सीईटी झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची संधी गेली. सरकारच्या या निर्णयाला अ‍ॅटमा ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांने न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी तीनच प्रवेश परीक्षा ग्राह्य धरण्याच्या आदेशाची पुढील वर्षीपासून अंमलबजावणी करण्यात यावी, असा निर्णय दिला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानुसार सीईटी सेलने एमबीएची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती थांबविली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेच्या सीईटी निकालानंतर सीईटी सेलने इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. फार्मसी आणि इंजिनिअरिंगचे अर्ज भरण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिल्याने या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, असे आवाहन सीईटी सेलमधील अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MBA admission process postponed again

By Naukari Adda Team


The Mumbai High Court has directed the government to implement the decision of the State Common Entrance Test (CET) or Central Entrance Test (CAT, CMAT) for admission to management courses. Therefore, the CET cell has decided to temporarily suspend the admission process for MBA. The re-admission will be resumed following the instructions of the state government, the CET cell said.

Till last year, the marks of many examinations like AATMA, SAT, MAT, etc., conducted by private institutes were being considered for admission. But last year, it was revealed that about 40 students had got admission in reputed institutes by attaching fake marks in private institute examinations. Therefore, the state government decided to accept the marks of CET, CAT, CMAT examinations for admission to the management postgraduate course. However, the decision was released after the CET. So many students missed the opportunity to take the exam. The government's decision was challenged in court by students who sat for the AATMA exam. In this case, the order to accept only three entrance exams should be implemented from next year.

Following the court's decision, the CET cell has temporarily suspended the admission process for the MBA. Admission will be resumed as per the decision of the state government. Meanwhile, the CET cell has started the admission process for the engineering and pharmacy courses after the CET results of the first year entrance examination of the vocational course. With a few hours left to fill up the pharmacy and engineering applications, students should apply for the course, officials from the CET cell said.

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021