आरटीओ’निरीक्षकांची ८०० हून अधिक जागा रिक्त!

By Naukari Adda Team


आरटीओ’निरीक्षकांची ८०० हून अधिक जागा रिक्त!, More than 800 vacancies for RTO inspectors!

राज्यात मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची पदे  मोठय़ा प्रमाणात  रिक्त असल्यामुळे आरटीओतील कामांचा खोळंबा होत आहे. या दोन्ही पदांच्या एकूण ८०० हून अधिक जागा रिक्त असून त्यापाठोपाठ प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पदांचाही समावेश आहे. त्यामुळे वाहनांशी संबंधित अनेक कामांना विलंब होत  असून राज्यातील अवैध वाहतुकीविरोधातील विशेष कारवाई  थंडावली आहे.

आरटीओत शिकाऊ वाहन परवाना, पक्का परवाना याबरोबरच वाहन चाचणी, वाहन तपासणी इत्यादी वाहनांशी संबंधित कामांसाठी दररोज अनेक जण येत असतात. टाळेबंदीआधी आरटीओत येणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे आरटीओ नेहमीच गजबजलेले होते. टाळेबंदी लागताच सुरुवातीचे चार महिने वर्दळच नव्हती. मात्र शिथिलिकरणानंतर आरटीओतील कामकाज हळूहळू पूर्ववत झाले. त्यातच अनेकांनी मोठय़ा संख्येने खासगी वाहने घेण्यावर भर दिला. परिणामी कामकाज वाढले. करोनामुळे आरटीओतील कर्मचाऱ्यांची कमी उपस्थिती आणि त्यातच कमी मनुष्यबळामुळे कामाचा ताण वाढला आहे. परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओतील परिवहन अधिकारी, सहाय्यक आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारीबरोबरच मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकू ण ८५५ जागा रिक्त आहेत. यातील मोटार वाहन निरीक्षकाची ८६७ मंजूर पदे असतानाच २७९ पदे, तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाच्या राज्यात १,३०२ मंजूर पदांपैकी ५३३ पदे रिक्त आहेत.

परिणामी शिकाऊ परवान्यासाठी परिक्षेच्या तारखा वेळेत न मिळणे, पक्का परवावा देण्यासाठीही काहीसा विलंब होणे, याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी  किंवा मालवाहतूक यावरील कारवायाही थंडावल्या आहेत.  प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहाय्यक व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्याही रिक्त जागा त्वरीत भरण्याकडे सरकारने दुर्लक्षच के ले आहे.

सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांचे प्रशिक्षण सुरु असून ते लवकरच रुजू होतील. तर मोटर वाहन निरीक्षकांमध्ये ४६ जणांची बढती असून त्याची शासनाकडून मंजुरी येणे बाकी आहे. याशिवाय सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याही जागा भरल्या जाणार असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारीमध्येही लवकरच बढती देण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी  बढती देण्यासाठी  असलेल्या समितीची बैठक झालेली नाही. ती झाली की पुढील प्रक्रि याही होईल.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


More than 800 vacancies for RTO inspectors!

By Naukari Adda Team


Due to the large number of vacancies for Motor Vehicle Inspectors and Assistant Motor Vehicle Inspectors in the state, the work in RTOs is being hampered. There are more than 800 vacancies in both the posts, followed by Regional Transport Officer, Assistant and Deputy Regional Transport Officer. As a result, many works related to vehicles are being delayed and special action against illegal traffic in the state has been suspended.

Many people come to the RTO every day for work related to learner's vehicle license, permanent license as well as vehicle testing, vehicle inspection etc. The number of people coming to the RTO was higher before the lockout. So the RTO was always buzzing. The first four months were not crowded at all. However, after the relaxation, the functioning of the RTO was gradually restored. In addition, many insisted on buying a large number of private vehicles. As a result, the workload increased. Corona has increased work stress due to low attendance of RTO staff and low manpower. According to sources in the transport department, a total of 855 posts of Motor Vehicle Inspectors and Assistant Motor Vehicle Inspectors are vacant along with Transport Officers, Assistant and Deputy Regional Transport Officers in the RTO. Of these, there are 867 sanctioned posts of Motor Vehicle Inspectors while 279 posts are vacant, while 533 out of 1,302 sanctioned posts of Assistant Motor Vehicle Inspectors are vacant in the state.

As a result, delays in getting exam dates for learner's licenses, delays in issuing final licenses, as well as illegal passenger transport, overcrowding or freight have been curtailed. The government has neglected to fill the vacancies of Regional Transport Officers and Assistant and Deputy Regional Transport Officers.

Training of Assistant Motor Vehicle Inspectors is underway and will be introduced soon. The number of motor vehicle inspectors has been increased to 46 and approval from the government is yet to come. Apart from this, the posts of Assistant Regional Transport Officers will also be filled and the process of promotion of Deputy Regional Transport Officers is underway soon. The committee for promotion as Regional Transport Officer has not met. If that happened then the next process would follow.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda