नोकरी आली धावून: मुंबईत अणुशक्ती विभागात नोकरीची संधी

By Naukari Adda Team


नोकरी आली धावून: मुंबईत अणुशक्ती विभागात नोकरीची संधी, Jobs rushed: job opportunities in the Atomic Energy Department in Mumbai

सरकारी नोकरीची भुरळ आजही अनेकांना आहे. मुळात सरकारी नोकरी (Sarkari Nokri) कशी मिळते? त्यासाठी पात्रता काय असावी लागते? अर्ज कधी निघतात? अर्ज कसे भरायचे? निवडप्रक्रिया कशी होते? स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता असतो? असे व याहूनही निरनिराळे प्रश्न उमेदवारांच्या मनात काहूर निर्माण करतात आणि त्याच वेळी म्हणजेच योग्य वेळी, योग्य माहिती मिळाली नाही तर सरकारी नोकरी हे फक्त स्वप्नच उरतं.

स्पर्धा परीक्षांची ओळख आता सर्व विद्यार्थ्यांना झालेली आहे. स्पर्धा परीक्षांतून विद्यार्थी आपलं भवितव्य उज्ज्वल करू शकतात. त्याचबरोबर राष्ट्र निर्माणासाठी चांगली कामगिरीही करू शकतात. नुकतीच अणुशक्ती विभागात स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, ज्युनिअर स्टोअरकिपर या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. स्टेनोग्राफर पदासाठी दहावी उत्तीर्ण व स्टेनोग्राफी कोर्स तसेच टायपिंग तर वरिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर व ज्युनिअर स्टोअरकिपरसाठी सायन्स पदवीधर (६० टक्के) अथवा कॉमर्स पदवीधर (६० टक्के) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक/ इलेक्ट्रीकल डिप्लोमा किंवा कम्प्युटर सायन्स अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आहे.

स्टेनोग्राफर पदासाठी दोन स्तरावर म्हणजे ऑब्जेटिव्ह टाइप टेस्ट आणि त्यानंतर स्टेनोग्राफर स्किल टेस्ट अशी निवडप्रक्रिया असेल. वरिष्ठ लिपिक आणि ज्युनिअर स्टोअरकिपर पदासाठी ऑब्जेटिव्ह टेस्ट व त्यानंतर डिस्क्रीप्टीव्ह टेस्ट अशा दोन स्तरावर निवडप्रक्रिया होईल. ऑब्जेटिव्ह परीक्षेमध्ये जनरल इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टीट्यूड असे तीन विषय असून २०० प्रश्नांसाठी २०० गुण आणि त्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात आलेला आहे.

ज्युनिअर स्टोअरकिपर पदासाठी या विषयांबरोबर जनरल नॉलेज व संगणक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. डिस्क्रीप्टीव्ह टेस्टमध्ये इंग्रजी भाषा आणि कॉम्प्रेहेन्शन यावर १०० गुणांची तीन तासांची परीक्षा असेल. संस्थेचं नाव- अणुशक्ती विभाग पदाचं नाव- स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, ज्युनिअर स्टोअर किपर अंतिम मुदत- २७ डिसेंबर, २०२० वयोमर्यादा- १८ ते २७ वर्षं

 

वेबसाईट : www.dpsdae.formflix.in


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Jobs rushed: job opportunities in the Atomic Energy Department in Mumbai

By Naukari Adda Team


Many are still attracted to government jobs. How do you get a government job (Sarkari Nokri)? What does it take to qualify? When do applications go out? How to fill the application? How is the selection process? What is a competitive exam? What is the syllabus for the exam? Such and even more questions create confusion in the minds of the candidates and at the same time, that is, at the right time, without getting the right information, a government job is just a dream.

Competitive exams are now introduced to all students. Students can brighten their future through competitive exams. At the same time, they can do well for nation building. Recently, advertisements have been published for the posts of Stenographer, Senior Clerk, Junior Storekeeper in the Department of Atomic Energy and applications can be submitted till December 27. For Stenographer post, pass 10th and Stenography course as well as Typing, for Senior Clerk post, graduate in any branch and for Junior Storekeeper, Science Bachelor (60 per cent) or Commerce Bachelor (60 per cent) or Mechanical / Electronic / Electrical Diploma or Computer Science.

The selection process for the post of Stenographer will be at two levels namely Objective Type Test and then Stenographer Skill Test. The selection process for the post of Senior Clerk and Junior Storekeeper will be at two levels namely Objective Test and then Descriptive Test. The Objective Examination consists of three subjects viz. General English, Intelligence Test, Quantitative Aptitude and 200 marks for 200 questions and a period of two hours.

Questions based on General Knowledge and Computer Knowledge will be asked along with these topics for the post of Junior Storekeeper. The descriptive test will consist of a three-hour test of 100 marks on English language and comprehension. Name of the organization - Atomic Energy Department Name of the post - Stenographer, Senior Clerk, Junior Store Keeper Deadline - December 27, 2020 Age limit - 18 to 27 years

 

Website: www.dpsdae.formflix.in


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021