राज्यात ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकाची लवकरच पदोन्नती

By Naukari Adda Team


राज्यात ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकाची लवकरच पदोन्नती, 48 Assistant Motor Vehicle Inspectors to be promoted in the state soon

राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीही बरीच पदे रिक्त आहेत.

करोनामुळे परिवहन खात्यातील भरारी पथकांचा महसूल निम्म्याने  घटला आहे.  मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने कारवाईवर मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन विलंबानेच का होईना पण, परिवहन खात्याने राज्यातील ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नतीने मोटार वाहन निरीक्षक करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे.

राज्यात परिवहन खात्याच्या अखत्यारितील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन अशी (आरटीओ) ५० कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांच्या अखत्यारित ५० ते ७५ भरारी पथके आहेत. या पथकांकडून  नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. टाळेबंदी काळात  या पथकांची कारवाई बंद होती. त्यामुळे  यावर्षी केवळ ३९ कोटी ९७ लाख २४ हजार रुपयांचा महसूल मिळाला. हा महसूल मागच्या वर्षीपेक्षा निम्म्याने कमी आहे. त्यात पुन्हा मोटार वाहन निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने  भरारी पथकांना कारवाईसाठी बाहेर पडता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहा सहायक अधिकाऱ्यांनाही पदोन्नती

राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीही बरीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे परिवहन खात्याने सहा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदावर पदोन्नती देण्याचा प्रस्तावही सामान्य प्रशासन विभागाला दिला आहे. त्यामुळे हे सहा अधिकारीही लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

‘‘परिवहन खात्याने ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि काही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे निश्चित केले आहे. हा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे गेला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल. नियुक्ती करताना जास्त जागा रिक्त असलेल्या आरटीओ कार्यालयांना प्राधान्य दिले जाईल.’’

 

 

सोर्स : लोकसत्ता 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


48 Assistant Motor Vehicle Inspectors to be promoted in the state soon

By Naukari Adda Team


There are also many vacancies for sub-regional transport officers in the state.

Corona has halved the revenue of the transport department. As many posts of motor vehicle inspectors are vacant, action is being limited. Despite the delay, the transport department has sent a proposal to the general administration department to promote 48 assistant motor vehicle inspectors in the state to motor vehicle inspectors.

There are 50 Regional Transport Offices and Sub-Regional Transport (RTO) offices under the Transport Department in the State. All these offices have 50 to 75 flying squads. These squads take action against vehicles violating the rules. The action of these squads was closed during the lockout period. Therefore, only 39 crore 97 lakh 24 thousand rupees of revenue was received this year. This revenue is less than half of the previous year. Again, as the posts of motor vehicle inspectors are vacant, the flying squads cannot go out for action. With this in mind, it has been decided to promote 48 Assistant Motor Vehicle Inspectors.

Six assistant officers were also promoted

There are also many vacancies for sub-regional transport officers in the state. Therefore, the Transport Department has also proposed to the General Administration Department to promote six Assistant Regional Transport Officers to the post of Sub-Regional Transport Officer. So these six officers are also likely to be available soon.

"The transport department has decided to promote 48 assistant motor vehicle inspectors and some assistant regional transport officers. The proposal has gone to the General Administration Department and will be approved soon. Preference will be given to RTO offices with more vacancies when making appointments.

 

 

Source: Loksatta


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda