“एमपीएससी’ परीक्षेचा निर्णय डिसेंबरअखेर!

By Naukari Adda Team


“एमपीएससी’ परीक्षेचा निर्णय डिसेंबरअखेर!, MPSC exam decision by end of December!

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाच्या विरोधामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नियोजित बाराशे पदांची भरती थांबविण्याचा निर्णय घेतला. आता विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा लवकर व्हावी, असा प्रस्ताव आयोगाने सामान्य प्रशासनाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. आता तो प्रस्ताव राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसिमितीपुढे ठेवण्यात आला आहे. तर आरक्षणासंबंधी अंतिम निर्णय होईपर्यंत “एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना “ईडब्ल्यूएस’चा लाभ देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. डिसेंबरअखेर परीक्षेसंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्ण परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्‍त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. या तिन्ही परीक्षाअंतर्गत राज्यभरातून एक हजार 206 पदे भरली जाणार आहेत. तत्पूर्वी, एप्रिल- मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा कोरोनामुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सेवेची पूर्वपरीक्षा 11 ऑक्‍टोबरला तर 1 नोव्हेंबरला अभियांत्रिकी सेवा आणि 22 नोव्हेंबरला अराजपत्रित गट “ब’ची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले. त्यानुसार परीक्षेचे नियोजनही झाले, मात्र आरक्षणाच्या स्थगितीला विरोध दर्शवत परीक्षा रद्दची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने अद्याप परीक्षेसंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही. दुसरीकडे, आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रखडलेल्या नियुक्‍त्या व नियोजित परीक्षांसंदर्भात तातडीचा निर्णय घेताना “एसईबीसी’तील विद्यार्थ्यांना “ईडब्ल्यूएस’चा लाभ देता येईल का, असाही प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीपुढे ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चचा करून लवकरच निर्णय होईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

आयोगाच्या नियोजित परीक्षा व पदांची संख्या 

 राज्य सेवा पूर्वपरीक्षा : 200
अराजपत्रित गट ब संयुक्‍त पूर्व परीक्षा : 806
अभियांत्रिकी संयुक्‍त परीक्षा : 217
अर्जदार अंदाजित विद्यार्थी : 7.82 लाख
मंत्रिमंडळ उपसमिती घेईल अंतिम निर्णय 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंबंधीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे पाठविला आहे. त्यावर अजून निर्णय झाला नसून काही दिवसांत निर्णय होईल

 

 

 

सोर्स: सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MPSC exam decision by end of December!

By Naukari Adda Team


After the Supreme Court postponed the Maratha reservation, the state government decided to stop the recruitment of the planned twelve hundred posts of the Maharashtra Public Service Commission due to the opposition of the Maratha community. Sources said that the commission has sent a proposal to the general administration that the examination should be held soon in the interest of the students. The proposal has now been placed before the Cabinet sub-committee of the state government. Discussions are underway to give the benefit of "EWS" to the candidates in the "SEBC" category till the final decision on the reservation is taken. A decision on the exam will be taken by the end of December, said a senior official in the general administration department.

Maharashtra Public Service Commission will conduct State Service Examination, Engineering Service Complete Examination and Secondary Service Non-Gazetted Group B Joint Pre-Examination. One thousand 206 posts will be filled across the state under these three examinations. Earlier, the April-May exams were postponed twice due to corona. The commission then announced the schedule for the state service pre-examination on October 11, the engineering service on November 1 and the non-gazetted group "B" on November 22. Accordingly, the examination was also planned, but the examination was canceled in protest of the postponement of the reservation. The state government has canceled the exam in time and no decision has been taken yet. On the other hand, a proposal has also been put before the Cabinet sub-committee on whether the students of SEBC can be given the benefit of EWS in making an urgent decision regarding the stagnant appointments and scheduled examinations after the reservation was postponed. In this regard, a decision will be taken soon after discussing with the Chief Minister and Deputy Chief Minister, the sources said.

Commission's scheduled examinations and number of posts

State Service Pre-Examination: 200
Non-Gazetted Group B Joint Pre-Examination: 806
Engineering Joint Examination: 217
Applicant Estimated Students: 7.82 lakh
The Cabinet sub-committee will take the final decision

The proposal regarding the examination of Maharashtra Public Service Commission has been sent by the General Administration Department to the Cabinet Sub-Committee. It has not been decided yet and will be decided in a few days

 

 

Source: Sakal


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda