विद्यार्थ्यांच्या OMR शीट मध्ये गैरप्रकार? NTA ला कोर्टाची नोटीस

By Naukari Adda Team


विद्यार्थ्यांच्या OMR शीट मध्ये गैरप्रकार? NTA ला कोर्टाची नोटीस, Abnormalities in students

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी, शिक्षण मंत्रालय आणि मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ला नोटीस पाठवली. NEET 2020 परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या ओेएमआर शीटमध्ये (OMR Sheet) फेरफार केल्याचा आरोप करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली. यासंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी एनटीएला ४ जानेवारी २०२१ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

या याचिकेसंदर्भात आपले म्हणणे मांडावे असे या नोटिशीद्वारे संबंधितांना सांगण्यात आले आहे. न्या. जयंत नाथ यांनी ही सुनावणी घेतली. पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

ही याचिका १४ विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे. अॅड. गोपाल शंकरनारायणन आणि अॅड. तन्वी दुबे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत. या विद्यार्थ्यांच्या NEET 2020 OMR उत्तरपत्रिकांशी छेडछाड करण्यात आली असून ब्लँक OMR, चुकीचे रोल नंबर, अयोग्य बारकोड आणि एकाच विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळ्या तारखांचे दोन वेगवेगळे स्कोर असे प्रकार घडल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. एनटीएने मूळ ओएमआर शीट उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. शिवाय एनटीएने २७ सप्टेंबर २०२० रोजी जारी केलेली नोटीस रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे. या परिपत्रकात आन्सर कीला आव्हान देण्याचं प्रोसिजर देण्यात आलं आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Abnormalities in students' OMR sheets? Court notice to NTA

By Naukari Adda Team


The Delhi High Court on Monday sent notices to the National Testing Agency, the Ministry of Education and the Medical Counseling Committee (MCC). A petition has been filed in the Delhi High Court alleging tampering with the OMR sheet of a student appearing for the NEET 2020 exam. The notice was sent in this regard. The NTA has been given till January 4, 2021 to present its case.

The notice has asked the concerned to state their views on the petition. Justice Jayant Nath conducted the hearing. The next hearing is scheduled for January 8, 2021.

This petition has been filed by 14 students. Adv. Gopal Sankaranarayanan and Adv. Tanvi Dubey is the counsel for the petitioners. Petitioners allege that the NEET 2020 OMR answer sheets of these students were tampered with, resulting in blank OMR, incorrect roll number, incorrect barcode and two different scores of the same student on two different dates. The petitioners also demanded that the NTA make the original OMR sheet available. The petitioners also sought cancellation of the notice issued by the NTA on September 27, 2020. This circular gives the procedure to challenge the answer key.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda