अभाविपच्या नऊशे नि:शुल्क शाळा

By Naukari Adda Team


अभाविपच्या नऊशे नि:शुल्क शाळा, Nine hundred free schools of Abhavip

नागपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. स्मार्टफोन, टॅब्लेट, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि नानाविध अॅपच्या माध्यमातून शिक्षणाची ही 'स्मार्ट' गंगा वाहत आहे. मात्र, या सर्व सुविधांची वानवा असलेल्यांच्या आयुष्यातून शिक्षण कायमचे 'ऑफ' होऊ नये, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (


अभाविप) संपूर्ण देशभरात नऊशेहून अधिक नि:शुल्क शाळा सुरू आहेत. ज्यामुळे वंचितांसाठी शिक्षणाची कवाडे 'ऑन' झाली आहेत.

जागतिक महामारीने आरोग्याच्या समस्येसह विविध नव्या प्रश्नांना जन्म दिला आहे. प्रत्यक्ष शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. परंतु, हातावर पोट असणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांसाठी स्मार्टफोनवर शिक्षण घेणे स्वप्नातही शक्य नाही. अशा स्थितीत अभाविप या विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेत 'परिषद की पाठशाला' या नावाने गरीब वस्त्यांमध्ये ऑफलाइन शाळा सुरू केली आहे. विद्यार्थ्याच्या इयत्तेनुसार, त्याचा अभ्यासक्रम पूर्वीच्या प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीप्रमाणे पूर्ण करण्यात येत आहे. दहा ते पंधरा जणांचा समूह तयार करून स्वयंसेवक आणि सेवाभावी शिक्षकांद्वारे झोपडपट्टी वस्त्यांमध्ये अशा प्रकारची शाळा सुरू आहे. यामध्ये गणित, विज्ञान, इंग्लिशसह सर्व विषयांचा अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहे. याबाबत अधिक सांगताना विदर्भ प्रांतमंत्री रवी दांडगे म्हणाले,'नागपुरात खरबी, शिवाजीनगर झोपडपट्टी, गवळीपुरा, काचीपुरा, अमरनगरसह ग्रामीण भागांमध्ये शाळा सुरू आहे. त्याशिवाय विदर्भातील अकोला, भंडारा, चंद्रपूर, वाशीम येथे या प्रकारच्या शाळांला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.'

शाळांची संख्या वाढणार

आधुनिक तंत्रज्ञानाअभावी शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, या उद्देशाने नि:शुल्क शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार, यांची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती अभाविपचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक राहुल चौधरी यांनी दिली.

'परिषद की पाठशाला' दृष्टिक्षेपात

एकूण जिल्हे - २४३

एकूण शाळा पाठशाला - ९०६

एकूण विद्यार्थी - ५,०८८
 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Nine hundred free schools of Abhavip

By Naukari Adda Team


Nagpur: Online education has started on the backdrop of Corona. This 'smart' river of education is flowing through smartphones, tablets, computers, laptops and various apps. However, education should not be permanently 'off' from the lives of those who are deprived of all these facilities.


Abhavip) ​​There are more than 900 free schools across the country. As a result, the doors of education for the underprivileged have become 'on'.

The global epidemic has given rise to various new questions, including health problems. Online education has been introduced as actual schools are closed. But, it is not even possible to dream of getting an education on a smartphone for those who have a stomach on their hands and are financially weak. In such a situation, Abhavip has taken the initiative to start an offline school in the slums under the name 'Parishad Ki Pathshala' Depending on the class of the student, his / her curriculum is being completed in the same manner as before. This type of school is started in slum areas by volunteers and service-minded teachers by forming a group of ten to fifteen people. In this, courses of all subjects including Mathematics, Science, English are being taught. Explaining more about this, Vidarbha State Minister Ravi Dandge said, 'Schools are running in rural areas including Kharbi, Shivajinagar slums, Gawalipura, Kachipura, Amarnagar in Nagpur. Apart from that, such schools in Akola, Bhandara, Chandrapur and Washim in Vidarbha have received good response.

The number of schools will increase

Free schools have been started with the objective that no one should be deprived of education due to lack of modern technology. As required, the number will be increased, said Rahul Chaudhary, National Media Coordinator, Abhavip.

At the sight of 'Council's School'

Total Districts - 243

Total School Pathshala - 906

Total students - 5,088


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda