'१० वी १२ वीच्या परीक्षा, अभ्यासक्रमाबाबत राज्यात गोंधळ'

By Naukari Adda Team


राज्यात दहावी व १२ वीच्या परीक्षांच्या तारखा कधी घोषित होतील व अभ्यासक्रम किती असेल याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित धोरण ठरविले जात नसून हा संभ्रम दूर करावा अशी मागणी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. भाजपा शिक्षक आघाडीच्या राज्य संयोजक डॉ कल्पना पांडे यांच्या नेतृत्ववाखाली अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

राज्यात १० वी व १२ वीच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तथापि १० वी व १२ वीच्या परीक्षा कधी घेणार ? अभ्यासक्रम किती असणार तसेच पेपर पॅटर्न कसे असणार याविषयी विद्यार्थी व शिक्षकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी दहावीला १७ लाख तर १२ वी ला १५ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होतात. हे सर्व विद्यार्थी ९ वी पासून नवीन पॅटर्न नुसार अभ्यास करीत आहेत त्यामुळे अभ्यासक्रम कमी करावा मात्र पॅटर्न बदलवू नये अशीही मागणी शिक्षकांकडून होत आहे.

राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू असल्यातरी विद्यार्थी कमी उपस्थित आहे तर मुंबई विभागात अजूनही शाळा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन वर्गाला पण अनेक पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कृपया दहावी व बारावीच्या परीक्षा कधी घेणार ? अभ्यासक्रम किती असेल याबाबत तातडीने निर्णय घेऊन राज्यातील ३२ लाखाहून अधिक पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनातील संभ्रम दूर करावा असे भाजपा कोकण विभाग संयोजक एन एम भामरे व मुंबई विभाग संयोजक राजू बंडगर, जिल्हा अध्यक्ष सचिन पांडे, राजेश मोरे यांनी सांगितले.

 

 

सोर्स : म.टा 
 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


'Confusion in the state about 10th and 12th exams, syllabus'

By Naukari Adda Team


Anil Bornare of BJP Pradesh Shikshak Aghadi has demanded that the school education department is not deciding when the dates of 10th and 12th examinations will be announced in the state and how much the syllabus will be. Anil Bornare, led by BJP Teachers Alliance state convener Dr Kalpana Pandey, has made the demand in a letter to school education minister Varsha Gaikwad and the president of the Board of Secondary and Higher Secondary Education.

The process of filling up applications from 10th and 12th class students has started in the state. However, when will you take 10th and 12th exams? Students and teachers are confused about how much the curriculum will be and how the paper pattern will be. Every year more than 17 lakh students appear for class X and more than 15 lakh students appear for class XII. All these students have been studying according to the new pattern since 9th standard, so there is a demand from the teachers that the syllabus should be reduced but the pattern should not be changed.

Although schools are open in many places in the state, student attendance is low, while online education is on in Mumbai division as no decision has been taken yet to start a school. Online classes but due to the financial situation of many parents, students have to be deprived of online education. When will you take the 10th and 12th exams, please? BJP Konkan division convener NM Bhamre and Mumbai division convener Raju Bandagar, district president Sachin Pandey and Rajesh More said that the confusion in the minds of more than 32 lakh parents, students and teachers in the state should be removed immediately by taking an immediate decision on the number of courses.

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda