महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ट्रेनी पदांसाठी भरती

By Naukari Adda Team


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ट्रेनी पदांसाठी भरती, Recruitment for Trainee Posts in Maharashtra State Road Transport Corporation

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेड येथे सन 2020-21 या  सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून एकुण  56 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यात यांत्रिक-36, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-10, पेंटर-1, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-1, अभियांत्रिक पदवीधर/पदवीका-2 या पदांचा समावेश आहे.आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.org व अभियांत्रिकी पदवीधर/पदवीकाधारक उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करुन MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर राज्य परिवहन नांदेड विभागाचा  विहित नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करावा. कार्यालयाचे छापील नमुन्यातील अर्ज भरुन देण्याची मुदत बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत आहे. हा छापील अर्ज विभागीय कार्यालय,
कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. या अर्जाची किंमत (जीएसटी 18 टक्के सहीत) खुल्या प्रर्वगाकरिता 590 रुपये तर मागासवर्गीयासाठी 295 रुपये आहे, अशी माहिती राज्य परिवहन नांदेडचे विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

 

सोर्स: सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment for Trainee Posts in Maharashtra State Road Transport Corporation

By Naukari Adda Team


A total of 56 posts will be filled online as apprentices (trainees) for various occupations for the session 2020-21 at Maharashtra State Road Transport Corporation Nanded Division Nanded. These include Mechanical-36, Electrifier-6, Sheet Metal Works-10, Painter-1, Welder (Gas and Electric) -1, Engineering Graduate / Diploma-2. Successful candidates must first register online at www.apprenticeshipindia.org and engineering graduate / graduate candidates at www.mhrdnats.gov.in and apply online for MSRTC Division Nanded. After applying online, the printed form in the prescribed form of State Transport Nanded Department should be filled and submitted. The deadline for filling out the application in the printed form of the office is Wednesday, January 6, 2021 at 3 p.m. This printed application is submitted to the Divisional Office,
Staff will be available at Rap Branch Nanded on Wednesday 6th January 2021 till 3pm on Saturdays and holidays from 10am to 3pm and will be accepted immediately. The cost of the application (including 18 per cent GST) is Rs 590 for the open category and Rs 295 for the backward class, the state transport Nanded's divisional controller said in a press release.

 

 

Source: Sakal


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda