जानेवारीअखेर आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया पूर्ण करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

By Naukari Adda Team


जानेवारीअखेर आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया पूर्ण करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे, Complete the recruitment process in the health department by the end of January - Health Minister Rajesh Tope

मुंबई, दि. 31 : सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ.साधना तायडे, डॉ.अर्चना पाटील, सह आयुक्त डॉ.सतीश पवार आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाईल सर्जिकल युनिट सुरु करावे

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्यमंत्र्यांनी ही बैठक घेत यंत्रणेला अधिक सक्षमपणे आणि सेवेचा दर्जा उंचावण्याचे आवाहन केले. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे काम चांगले झाले असून आता राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत त्या तातडीने कराव्यात. मोबाईल सर्जिकल युनिट सुरु करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Complete the recruitment process in the health department by the end of January - Health Minister Rajesh Tope

By Naukari Adda Team


Mumbai, dt. 31: While raising the standard of service, courtesy should be given to the common man. Information boards of important schemes of health department should be put up in every gram panchayat. The process of issuing certificates to the disabled should be facilitated, the process for recruitment in the public health department should be completed by the end of January. The number of corona patients in the state is coming under control and the public health system should pay attention to the service of non-covid patients. This was stated by Health Minister Rajesh Tope.

This year the health system is fighting a successful battle with the corona along with the citizens. Even if the corona is under control, the rules must be followed. The Health Minister wished everyone a healthy and coronary free New Year.

In order to speed up the recruitment process in the department, the Health Minister reviewed the situation through video conferencing with the Divisional Commissioners, Backward Classes Officers, Deputy Director of Health, District Surgeons and District Health Officers. On this occasion, Principal Secretary of Health Department Dr. Pradip Vyas, Commissioner Dr. Ramaswamy, Director Dr. Sadhana Tayde, Dr. Archana Patil, Joint Commissioner Dr. Satish Pawar etc. were present on this occasion.

Start a mobile surgical unit

The Health Minister called the meeting on New Year's Eve and appealed to the system to be more efficient and raise the standard of service. The public health system has done well during the Corona period and now the Corona situation in the state seems to be under control. Therefore, the district health system should pay more attention to non-covid patient care. Cataract surgery that has been pending for several days should be done immediately. A mobile surgical unit should be started, the health minister said.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda