'एमपीएससी'साठी आता सहाच संधी; २०२१ पासून अंमलबजावणी

By Naukari Adda Team


स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्याच्या संधींची कमाल मर्यादा निश्‍चित केली असून, उमेदवाराला सहा परीक्षा देण्यासाठी संधी मिळणार आहे. तर, इतर मागास प्रवर्गातील (OBC) उमेदवारास कमाल नऊ संधीची मर्यादा लागू करण्यात आली आहे. यापूर्वी, ही परीक्षा देण्यासाठी कमाल संधींची अट नव्हती. या निर्णयाची अंमलबजावणी २०२१ सालामध्ये प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींपासून होणार आहे. दरम्यान, या निर्णयावर राज्यातील उमेदवारांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतल्याचे 'एमपीएससी'ने सांगितले आहे. 'एमपीएससी'मार्फत विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवारांच्या नियुक्‍तीसाठी परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर, पात्र उमेदवारांची राज्य सरकारच्या विभागांकडे नियुक्‍तीसाठी शिफारस केली जाते. सरकारी पदांसाठी आतापर्यंत उमेदवाराला दिलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी होती. त्यामुळे वयाचा निकष संपेपर्यंत उमेदवार आयोगाच्या परीक्षा देत. या परीक्षांमध्ये उमेदवारांना अपयश आले, तरी ते पाच वर्षांपर्यंत तयारी करीत राहत. या परीक्षेच्या संधींसाठी काही मर्यादा निश्‍चित करण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर 'एमपीएससी'ने अखेर ही मर्यादा घालून दिली.

या नव्या निर्णयानुसार, 'एमपीएससी'च्या शासकीय पदांसाठी खुल्या संवर्गातील उमेदवाराला परीक्षेच्या सहा संधी उपलब्ध होतील, तर इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) उमेदवारास कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील. त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधींची मर्यादा लागू राहणार नाही, असे 'एमपीएससी'ने परिपत्राकाद्वारे स्पष्ट केले आहे.
 

अशाप्रकारे संधींची मोजणी

राज्यातील एखाद्या उमेदवाराने, एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती संधी समजली जाणार आहे. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरला किंवा त्याची उमेदवारी रद्द झाली, तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती गणली जाणार असल्याचे 'एमपीएससी'ने म्हटले आहे.

 

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Now there are only six opportunities for MPSC; Implementation from 2021

By Naukari Adda Team


The Maharashtra Public Service Commission has fixed a maximum limit of opportunities for candidates preparing for competitive examinations and the candidate will have the opportunity to appear for six examinations. So, a maximum of nine opportunities limit has been imposed on OBC candidates. Previously, this was not a condition of maximum opportunity to take the exam. This decision will be implemented from the advertisements published in the year 2021. Meanwhile, there has been a mixed reaction from candidates in the state to the decision.

The MPSC said the decision was taken to improve the selection process. MPSC conducts examinations for the appointment of suitable candidates for various government posts. Thereafter, eligible candidates are recommended for appointment to the departments of the State Government. For government posts so far the candidate had the opportunity to appear for the examination as many times as the age limit given. Therefore, candidates should appear for the commission examination till the age criteria expires. Although the candidates failed in these exams, they continued to prepare for five years. There was a demand from the candidates appearing for the competitive examination that some limits should be fixed for the opportunities of this examination. Against that background, the MPSC finally imposed this limit.

According to the new decision, open category candidates for MPSC government posts will have six exam opportunities, while Other Backward Classes (OBC) candidates will have a maximum of nine opportunities. Similarly, the maximum opportunities will not be applicable to the candidates belonging to the Scheduled Tribes and Scheduled Castes, the MPSC has clarified in a circular.


Thus counting opportunities

If a candidate from the state participates in the pre-examination of MPSC, it will be considered as an opportunity of the relevant competitive examination. If a candidate appears for any one of the pre-examination papers, that opportunity will be considered. The MPSC has said that even if a candidate is disqualified at any stage of the examination for any reason or his candidature is canceled, his attendance at the examination will be counted.

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda