३ हजार जागांची पशुसंवर्धन विभागात लवकरच होणार भरती !

By Naukari Adda Team


३ हजार जागांची पशुसंवर्धन विभागात लवकरच होणार भरती !, 3,000 posts to be recruited in Animal Husbandry Department soon!

राज्य सरकारने नव्या वर्षात बेरोजगार व नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा देण्याचे ठरवले असावे, कारण आरोग्य खात्यातील पदभरती लवकर करा असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्यानंतर आरोग्य व ग्रामविकास खात्यात ८ हजार जागांची भरती होणार आहे (सरकारकडून लवकरच ८००० पदांची मेगा भरती होणार..), तर दुसरीकडे पशुसंवर्धन विभागात ३ हजार जागांची भरती होणार असल्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केले आहे. या भरतीच्या पुढील अपडेटसाठी प्लेस्टोर वरून महाभरती अँप डाउनलोड करायला विसरू नका.

यामुळे राज्यात नव्या वर्षात मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पदभरती जानेवारी अखेर पूर्ण करा अशा सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या बहुतेक सर्वच नोकऱ्या खासगी व कार्पोरेट क्षेत्रातील आहेत. अशावेळी सरकारी नोकरी हीच कोणत्याही काळात आशेचा किरण ठरली आहे. त्यामुळेच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आरोग्य, ग्रामविकास व पशुसंवर्धन मंत्रालयाने दिलासा दिला आहे. जानेवारी महिन्यात आरोग्य खात्याची व फेब्रुवारी महिन्यात ग्रामविकास खात्याची भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठासह सर्व शासकीय पशुसंवर्धन दवाखान्यांमधील रिक्त पदेही भरली जाणार आहेत. ती पदे तीन हजारांच्या आसपास असल्याची माहिती या खात्याचे मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


3,000 posts to be recruited in Animal Husbandry Department soon!

By Naukari Adda Team


The state government may have decided to give a big relief to the unemployed and job-seeking candidates in the new year, as 8,000 posts will be filled in the health and rural development department after the health minister Rajesh Tope ordered them to be recruited soon. On the other hand, Animal Husbandry Minister Sunil Kedar has clarified that 3,000 posts will be filled in the Animal Husbandry Department. Don't forget to download Mahabharati App from Playstore for the next update of this recruitment.

This indicates that there will be a large number of recruitments in the new year in the state. Yesterday, Health Minister Rajesh Tope instructed to complete the recruitment by the end of January. During Corona's time, many lost their jobs. Almost all of these jobs are in the private and corporate sectors. In this case, the government job is a ray of hope at any time. That is why the Ministry of Health, Rural Development and Animal Husbandry has given relief to those who are trying for government jobs. The recruitment process for the health department is likely to start in January and the rural development department in February. Vacancies in all Government Animal Husbandry Hospitals, including the University of Animal and Fisheries Sciences under the State Animal Husbandry Department, will also be filled. Minister Sunil Kedar has informed that the number of posts is around three thousand.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda