एक वर्षाचा LLM अभ्यासक्रम होणार बंद; PG साठी नवी प्रवेश परीक्षा

By Naukari Adda Team


एक वर्षाचा LLM अभ्यासक्रम होणार बंद; PG साठी नवी प्रवेश परीक्षा, One-year LLM course will be closed; New entrance exam for PG

बार काउन्सिल ऑफ इंडियाने एक वर्ष कालावधीचा मास्टर डिग्री प्रोग्राम कोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम रद्द करण्यात येईल. कोणत्याही विधी विद्यापीठाला हा अभ्यासक्रम चालवण्याची मुभा नसेल.

हा अभ्यासक्रम २०१३ रोजी सुरू करण्यात आला होता. यापुढे एलएलएम पदवी ही दोन वर्षांचा चार सत्रांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच बहाल करण्यात येईल. बार काउन्सिलने पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नव्या प्रवेश परीक्षेचा प्रस्ताव (New Entrance Test for law pg) ठेवला आहे. पोस्ट ग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट इन लॉ (PGCETL) असे या परीक्षेचे नाव असेल. बार काउन्सिल ऑफ इंडिया लीगल एज्युकेशन (पोस्ट ग्रेजुएट, डॉक्टोरल, एक्झिक्युटिव, वोकेशनल, क्लिनिकल अँड अदर कंटीन्यूइंग एज्युकेशन) नियम २०२० या २ जानेवारी रोजी सूचित करण्यात आले. त्यानुसार हे बदल करण्याचे प्रस्तावित आहे.

नवे नियम कोणते?

- विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे २०१३ मध्ये सुरू केलेला एक वर्ष कालावधीचा लॉ मास्टर डिग्री प्रोग्राम या चालू वर्षाच्या शैक्षणिक सत्रापर्यंतच कार्यरत आणि मान्य असेल.

- नवा पोस्ट ग्रॅज्युएट लॉ मधील मास्टर डिग्री एलएलएम अभ्यासक्रम चार सेमिस्टरचा, दोन वर्षे कालावधीचा असेल.

- बार काउन्सिल ऑफ इंडिया दरवर्षी सर्व विद्यापीठांमध्ये लॉमधील मास्टर डिग्री कोर्सच्या प्रवेशासाठी पीजीसीईटीएल आयोजित करू शकते. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसारच विद्यार्थ्यांचे प्रवेश करणे बंधनकारक आहे.

- कोणतेही विद्यापीठ कोणाही व्यक्तीला कोणत्याही विषयात किंवा क्षेत्रात पदवीची डिग्री (LLM) प्रदान करणार नाही.

- BA. LL.B. किंवा BBA.LL.B किंवा B.Sc. LL.B. या सर्व पदवी किमान पाच वर्षांच्या कालावधीच्या शिक्षणानंतरच देण्यात येईल.

- परदेशी विद्यापीठातून समकक्ष एलएलबीशिवाय मिळवलेली एलएलएम पदवी, भारतीय एलएलएम डिग्रीशी समकक्ष असणार नाही.

 

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


One-year LLM course will be closed; New entrance exam for PG

By Naukari Adda Team


The Bar Council of India has decided to discontinue the one-year master's degree program. This course will be canceled from next academic year. No law university will be allowed to run this course.

This course was started in 2013. From now on, the LLM degree will be awarded only after completing a two-year four-session course. The Bar Council has proposed a New Entrance Test for Law (PG) for admissions to postgraduate law courses. The name of this examination will be Post Graduate Common Entrance Test in Law (PGCETL). The Bar Council of India Legal Education (Post Graduate, Doctoral, Executive, Vocational, Clinical and Other Continuing Education) Rules 2020 was notified on 2nd January. It is proposed to make these changes accordingly.

What are the new rules?

- The one year Law Master Degree Program started by the University Grants Commission in 2013 will be valid till the current academic session of the current year.

- The Master's Degree LLM course in the new Post Graduate Law will be of four semesters, duration of two years.

- The Bar Council of India may conduct PGCETL every year for admission to Master's degree courses in all universities. Admission of students is mandatory as per the merit list of this exam.

- No university will award a degree (LLM) in any subject or field to any person.

- BA. LL.B. Or BBA.LL.B or B.Sc. LL.B. All these degrees will be awarded after a minimum of five years of education.

- LLM degree obtained from a foreign university without equivalent LLB degree will not be equivalent to an Indian LLM degree.

 

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021