मराठा आरक्षण: MPSC साठीही आता 'EWS'चा पर्याय

By Naukari Adda Team


मराठा आरक्षण: MPSC साठीही आता

राज्यात मराठा आरक्षणाला अंतिरम स्थगिती मिळाल्यानंतर, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या पदभरती परीक्षांमध्ये 'SEBC' प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना १५ जानेवारीपर्यंत 'एमपीएससी'च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे पर्यायात बदल करायचा आहे, अशी माहिती 'एमपीएससी'कडून प्रकाशित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील 'एसईबीसी' प्रवर्गासाठी (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरीता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण अधिनियम, २०१८ नुसार आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सरकारकडून वेळोवेळी नमूद केलेल्या कार्यपद्धतीच्या आधारे संबंधित विभागांच्या मागणीनुसार 'एमपीएससी'मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या जाहिरातींमध्ये 'एसईबीसी' प्रवर्गासाठी पदे आरक्षित दर्शविण्यात आली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने 'एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांना सरळसेवा भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचे लाभ देण्यात येणार आहेत. त्यानुसार 'एसईबीसी' प्रवर्गातील उमेदवारांकडून अराखीव (खुला) किंवा 'ईडब्ल्यूएस' आरक्षणाचा लाभ घेण्याबाबतचा पर्याय 'एमपीएससी'ने उपलब्ध करून दिला आहे.

या परीक्षांसाठी पर्याय

- सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२०

- राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०

- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२०

- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०

आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी 'हे' करा -

- आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाइलद्वारे १५ जानेवारीपर्यंत संबंधित परीक्षेसाठी अर्जाद्वारे खुला किंवा 'ईडब्ल्यूएस' यापैकी कोणत्या आरक्षणातून लाभ घ्यायचा आहे, याचा विकल्प देणे आवश्यक.

- खुला किंवा 'ईडब्ल्यूएस'चा दावा विहित कालावधीत सादर न करणाऱ्या उमेदवारांचा फक्त अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करण्यात येईल.

- 'ईडब्ल्यूएस'चा लाभ घेतल्यास संबंधित उमेदवार 'एसईबीसी' आरक्षणासाठी पात्र ठरणार नाही.

- आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे पर्य़ाय सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.

 

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Maratha Reservation: 'EWS' option now for MPSC too

By Naukari Adda Team


Following the interim suspension of Maratha reservation in the state, the Maharashtra Public Service Commission (MPSC) has now made open or EWS option available to candidates in the 'SEBC' category in the recruitment examinations. Accordingly, the candidates have to change their options through the online system of MPSC till January 15, the information has been published by MPSC.

Reservation has been given for SEBC category in Maharashtra State (seats for admission in educational institutions in the state and appointments and posts in public service under the control of the state) as per the Reservation Act, 2018. The posts reserved for the 'SEBC' category are shown in the advertisements of various examinations published by the MPSC as per the demand of the concerned departments on the basis of the procedures mentioned by the Government from time to time in connection with the implementation of this reservation.

Following the Supreme Court order, the state government will provide SEBC category candidates with the benefit of reservation for the economically weaker sections for direct recruitment. Accordingly, MPSC has made available the option of availing non-open or EWS reservation from SEBC category candidates.

Options for these exams

- Assistant Motor Vehicle Inspector Pre-Examination 2020

- State Service Pre-Examination 2020

- Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Joint Pre-Examination 2020

- Maharashtra Engineering Service Pre-Examination 2020

Do this to get the benefit of reservation -

- Through the profile of the candidates in the online application system of the Commission, it is necessary to give the option of which of the reservations is to be availed from the open or 'EWS' by applying for the relevant examination till 15th January.

- Candidates who do not submit an open or 'EWS' claim within the stipulated period will be considered for selection to the non-open (open) post only.

- Concerned candidates will not be eligible for SEBC reservation if they avail the benefit of EWS.

- In case of candidates who have not submitted the option through the online application system of the Commission, the request for change of claim will not be granted under any circumstances at a later stage.

 

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda