महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर अनाथांना प्रथम संधी

By Naukari Adda Team


महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर अनाथांना प्रथम संधी, First opportunity for orphans on contract posts in Women and Child Development Department

अनाथ उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात प्रशासनाला गतिमान कार्यवाहीचे निर्देश दिले होते.

अनाथ उमेदवारांना शिक्षण तसेच राज्य शासकीय, निम शासकीय पदांवर नोकरीमध्ये एक टक्के समांतर आरक्षण आहे. तथापि, महिला व बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प, उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जाते. त्यामध्ये संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातील सहाय्यक व बहुउद्देशीय कर्मचारी, बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळावरील डाटा एन्ट्री ऑपरेटर, वन स्टॉप सेंटर येथील विविध पदे आदी पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातात. आता यापुढे या पदांवर अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. तथापि, या पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराने महिला व बालविकास विभागातील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र तसेच पदासाठीची शैक्षणिक, तांत्रिक, शारीरिक आदी आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक राहील.

 

 

सोर्स : लोकमत


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


First opportunity for orphans on contract posts in Women and Child Development Department

By Naukari Adda Team


The state government has decided to give a big relief to the orphan candidates. As per the government decision issued by the Department of Women and Child Development yesterday, special preference will be given to orphan candidates for the posts to be filled in the department through external system. Minister for Women and Child Development Adv. Yashomati Thakur and Minister of State Bachchu Kadu had directed the administration to take immediate action in this regard.

Orphan candidates have one per cent parallel reservation in jobs in education as well as state government, semi-government posts. However, many projects under the Department of Women and Child Development are recruited on a contract basis through external mechanisms. The posts of Assistant and Multipurpose Staff in the Office of the Defense Officer, Data Entry Operator on Child Welfare Committee and Juvenile Justice Board, various posts at One Stop Center etc. are filled on contract basis. From now on, special preference will be given to orphan candidates for these posts. However, while applying for these posts, the candidate will have to fulfill the orphan certificate issued by the competent authority in the Department of Women and Child Development as well as the educational, technical, physical and other eligibility criteria for the post.

 

 

 

Source: Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda