'त्या' अनाथ गुणवंताला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

By Naukari Adda Team


केवळ अनवधानाने झालेल्या एका तांत्रिक चुकीमुळे आयआयटी मुंबई या देशातील अत्यंत प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेतील प्रवेश हुकल्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घ्यावी लागलेल्या सिद्धांत बत्रा (१८) या अनाथ व अत्यंत गुणवंत विद्यार्थ्याला अखेर बुधवारी मोठा दिलासा मिळाला. या विशिष्ट प्रकरणात केवळ अपवाद म्हणून दिलेला आमचा हा आदेश पायंडा नसेल, असे स्पष्ट करून न्या. संजय किशन कौल, न्या. दिनेश महेश्वरी व न्या. हृषिकेश रॉय यांच्या पीठाने सिद्धांतचा आयआयटीमधील प्रवेश कायम केला.

यापूर्वी पीठाने सिद्धांतच्या अपिलात ९ डिसेंबर रोजी अंतरिम आदेश देताना तूर्तास सिद्धांतला 'इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग'च्या चार वर्षांच्या बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश देऊन अभ्यास करू द्यावा, असे निर्देश आयआयटी मुंबईला दिले होते. तसेच आयआयटी मुंबईला सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. 'एखाद्याची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन प्रवेशही निश्चित झाला असेल, तर तो आपला प्रवेश रद्द का करून घेईल? आपल्याला प्रवेशाची जागा मिळालेली असल्याने पुढच्या प्रक्रियेत सहभागी न होण्याबाबत पर्याय निवडायचा आहे, अशा गैरसमजातून सिद्धांतने तो पर्याय निवडला, हे दिसत आहे. त्याची ही चूक अनवधानाने झालेली आहे. मग शिक्षण संस्थेने अशा गुणवंत विद्यार्थ्याची तांत्रिक चूक समजून घ्यायला नको का?', असा प्रश्नही पीठाने त्यावेळी उपस्थित केला होता.

'सिद्धांतने अनवधानाने चूक केली होती. त्यामुळे आयआयटी मुंबईने या अपिलाकडे नकारात्मकदृष्ट्या पाहू नये', असे म्हणणे मांडत अॅड. प्रल्हाद परांजपे यांनी सिद्धांतला दिलासा देण्याची विनंती बुधवारच्या सुनावणीत पीठाला केली. तर 'न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संस्थेने सिद्धांतचा प्रवेश कायम ठेवून नियमित केला, तरी या प्रकरणाचा पायंडा पडू नये', अशा आशयाचे म्हणणे संस्थेच्या वकिलांनी मांडले. त्यानंतर पीठाने या प्रकरणातील विशिष्ट आदेश हा पायंडा समजला जाऊ नये, असे स्पष्ट करत सिद्धांतचा प्रवेश कायम करण्याचा आदेश देऊन त्याचे अपिल निकाली काढले.

तांत्रिक चुकीमुळे हुकला होता प्रवेश

जन्मत:च वडिलांचे छत्र नाही आणि दोन वर्षांपूर्वी आईचेही निधन झाल्याने अनाथ झालेल्या तसेच वयोवृद्ध आजी-आजोबांच्या छत्रछायेखाली वाढत असलेल्या सिद्धांतने अविश्रांत मेहनत घेऊन आयआयटी मुंबईची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली होती. 'जेईई अॅडव्हान्स्ड'सारख्या अत्यंत कठीण चाचणीत सहभागी होऊन तब्बल नऊ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांमधून त्याने देशभरातून २७० वा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे अनवधानाने झालेल्या केवळ एका तांत्रिक चुकीमुळे त्याचा आयआयटी मुंबईमधील प्रवेश हुकला असल्याचे पाहून हा विषय सर्वोच्च न्यायालयानेही गांभीर्याने घेतला.

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Supreme Court consoles 'that' orphan

By Naukari Adda Team


Siddhant Batra (18), an orphan and a very meritorious student, who had to run to the Supreme Court after being denied admission in one of the most prestigious educational institutions in the country due to a careless technical error, was finally relieved on Wednesday. Explain that our order, given only as an exception in this particular case, will not be the basis. Sanjay Kishan Kaul, Justice Dinesh Maheshwari and Justice. Hrishikesh Roy's bench upheld Siddhanta's admission in IIT.

Earlier, the bench, in its interim order on December 9, had directed IIT Mumbai to allow Siddhartha to pursue a four-year BTech course in Electrical Engineering. It also directed IIT Mumbai to file a detailed affidavit. 'If someone's admission process has been completed and admission has been confirmed, then why would he cancel his admission? Since you have a place of access, you want to choose not to participate in the next process. His mistake was inadvertent. Shouldn't the educational institution understand the technical error of such a meritorious student? ', Was also the question raised by the bench at that time.

'The theory was inadvertently wrong. Therefore, IIT Mumbai should not view this appeal in a negative light ', said Adv. Pralhad Paranjape requested the bench to give relief to Siddhant in the hearing on Wednesday. Proponents of her case have been working to make the actual transcript of this statement available online. Proponents of her case have been working to make the actual transcript of this statement available online. The bench then dismissed the appeal, ordering that the specific order in the case should not be construed as a precedent.

Admission was hooked due to technical error

He was born without a father's umbrella and two years ago his mother passed away. He had participated in a very difficult test like 'JEE Advanced' and was ranked 270th out of nine lakh 34 thousand students across the country. Therefore, the Supreme Court took the matter seriously as it saw that his admission to IIT Mumbai was denied due to a single inadvertent technical error.

 

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda